आजोबा आमच्यासोबत का राहत नाहीत?- चिमुकल्या अबरामचा बिग बींना प्रश्न
अमिताभ बच्चन, अबराम खान आणि शाहरुख खान (Photo Credits: Instagram)

सोशल मीडियावर स्टार किड्सचा नेहमीच बोलबाला असतो. शाहरुख खानचा मुलगा अबराम खान (Abram Khan) याच्याही क्युटनेस आणि निरागसतेची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा असते. शाहरुख खान (Shahrukh Khan) देखील अबरामसोबत फोटोज सोशल मीडियावर शेअर करत असतो. पण यावेळेस मात्र शाहरुखने नाही तर महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) यांनी अबरामसोबतच फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

बीग बींनी हा फोटो शेअर करण्यामागे एक खास कारणही आहे. हा फोटो शेअर करत अमिताभ यांनी लिहिले की, अबराम मला शाहरुखचे वडिल समजतो. याबद्दल त्याला काहीच शंका नाही. त्यामुळे त्याला प्रश्न पडतो की, "आपले आजोबा आपल्यासोबत का राहत नाहीत?"

 

अमिताभ बच्चन यांच्या या पोस्टवर शाहरुख खानने एक खास कमेंट केली. शाहरुखने लिहिले की, "सर तुम्ही येत जा ना! प्लीज, अबरामसोबत घरी राहत जा. कमीत कमी शनिवारी. त्याच्या आयपॅडमध्ये मजेशीर गेम्स आहेत. तुम्ही त्याच्यासोबत डुडल जंप खेळू शकता."

शाहरुख आणि अमिताभ बच्चन यांच्यामधील या संवादाने चाहत्यांचे मन जिंकले आहे.