Filmfare OTT Awards 2022: भारतात ओटीटीची लोकप्रियता गेल्या काही वर्षांत खूप वाढली आहे. अशातचं फिल्मफेअरने बुधवारी संध्याकाळी OTT अवॉर्ड्स 2022 (Filmfare OTT Awards 2022) कार्यक्रम आयोजित केला होता. या ओटीटी अवॉर्ड्स फंक्शनमध्ये अनेक वेब सिरीज आणि स्टार्संना पुरस्कार देण्यात आला. बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) ला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा समीक्षक पुरस्कार जिम सर्भला मिळाला. त्याचबरोबर पंचायत सीझन 2 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नीना गुप्ता (Neena Gupta) आणि अभिनेता जितेंद्र कुमार (Jitendra Kumar) यांनाही पुरस्कार देण्यात आला. ओटीटीवर पदार्पण करणाऱ्या साक्षी तन्वरला 'माई' मालिकेसाठी पुरस्कार मिळाला.
'रॉकेट बॉईज', 'गुलक 3', 'दसवीं' यांसारख्या वेब सिरीजमधील कलाकारांना चित्रपटासाठी वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले. 'रॉकेट बॉईज'ने अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. या मालिकेने सर्वोत्कृष्ट ओरिजिनल, पटकथा, वेशभूषा, निर्मिती यासह अनेक श्रेणींमध्ये पुरस्कार जिंकले. याशिवाय तापसी पन्नूला 'लूप लपेटा' या ओटीटी ओरिजिनल चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे. (हेही वाचा - Top 50 films of 2022: एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचे यश; यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट 50 जागतिक चित्रपटामध्ये मिळाले स्थान (See Full List))
फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार 2022 विजेत्यांची यादी:
सर्वोत्कृष्ट चित्रपट, वेब ऑरिजनलः दसवीं
सर्वोत्कृष्ट अभिनेता, ब ऑरिजनल फिल्मः अभिषेक बच्चन (दसवीं)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, वेब ऑरिजनल फिल्मः तापसी पन्नू (लूप लपेटा)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, वेब ऑरिजनल फिल्मः अनिल कपूर (थार)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री, वेब ऑरिजनल फिल्मः मीता वशिष्ठ (छोरी)
बेस्ट सीरीजः रॉकेट बॉयज
बेस्ट सीरीज क्रिटिक्सः टब्बर
बेस्ट डायरेक्टर सीरीजः अभय पन्नू (रॉकेट बॉयज)
बेस्ट डायरेक्टर सीरीज क्रिटिक्सः अजीतपाल सिंह (टब्बर)
बेस्ट एक्टर सीरीज: पवन मल्होत्रा (टब्बर)
बेस्ट एक्टर क्रिटिक्स (मेल) जिम सर्भ (रॉकेट बॉयज)
बेस्ट एक्ट्रेस सीरीजः रवीना टंडन (आरण्यक)
बेस्ट एक्ट्रेस, ड्रामा, क्रिटिक्सः साक्षी तंवर (माई)
बेस्ट एक्टर, कॉमेडी सीरीज: जमील खान (गुल्लक सीजन 3)
बेस्ट एक्टर, कॉमेडी, क्रिटिक्सः जितेंद्र कुमार (पंचायत सीजन 2)
बेस्ट एक्ट्रेस, कॉमेडी: गीतांजलि कुलकर्णी (गुल्लक सीजन 3)
बेस्ट एक्ट्रेस कॉमेडी क्रिटिक्सः मिथिला पालकर (लिटिल थिंग्स सीजन 4)
बेस्ट एक्टर ड्रामा सीरीज: गगन अरोड़ा (टब्बर)
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस ड्रामा सीरीज: सुप्रिया पाठक कपूर (टब्बर)
बेस्ट सपोर्टिंग एक्टर, कॉमेडी सीरीज: रघुबीर यादव (पंचायत सीजन 2)
बेस्ट सपोर्टिंग एक्ट्रेस, कॉमेडी सीरीज: नीना गुप्ता (पंचायत सीजन 2)
बेस्ट कॉमेडी सीरीज स्पेशलः गुल्लक सीजन 3
बेस्ट नॉन-फिक्शन ओरिजिनल, सीरीज/स्पेशलः हाउस ऑफ सीक्रेट्स बुराड़ी डेथ्स
दरम्यान, बुधवारी फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स 2022 मुंबईत जाहीर करण्यात आले. यावेळी जॅकी श्रॉफ, दिया मिर्झा, नीना कुलकर्णी, शमा सिकंदर, जरीन खान, रश्मी देसाई, रवीना टंडन, अमायरा दस्तूर, नवाजुद्दीन सिद्दीकी, श्वेता त्रिपाठी, नताशा भारद्वाज आणि अनुप्रिया गोएंका यांसारखे अनेक कलाकार अवॉर्ड शोच्या रेड कार्पेटवर उपस्थित होते.