Top 50 films of 2022: एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटाचे यश; यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट 50 जागतिक चित्रपटामध्ये मिळाले स्थान (See Full List)
RRR (Photo Credit - Twitter)

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांच्या 'आरआरआर' (RRR) चित्रपटाने देशात बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई केली. समीक्षकांनीही या चित्रपटाचे कौतुक केले. महत्वाचे म्हणजे देशाबाहेरही हा चित्रपट लोकप्रिय ठरला आहे. आता आरआरआरने आपल्या यशाचा एक नवा इतिहास लिहिला आहे. या चित्रपटाने आधीच अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकावले आहेत, आता या वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांमध्ये देखील त्याची गणना केली जात आहे.

ज्युनियर एनटीआर आणि राम चरण स्टारर 'आरआरआर' ने आता वर्षातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या जागतिक यादीत आपले नाव नोंदवले आहे. या यादीत आरआरआरने टॉम क्रूझच्या 'टॉप गन: मॅवेरिक'ला मागे टाकले आहे. ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटच्या साईट अँड साउंड मासिकाने (Sight and Sound Magazine) 2022 च्या 50 सर्वोत्कृष्ट चित्रपटांची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीमध्ये आरआरआरचा समावेश करण्यात आला आहे.

या यादीमध्ये एसएस राजामौली यांच्या या ऐतिहासिक चित्रपटाने नववे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, टॉम क्रूझच्या 'टॉप गन: मॅवेरिक'ला या यादीत 38 वे स्थान मिळाले आहे. शौनक सेन यांच्या 'ऑल द ब्रीड्स' या माहितीपटाचाही या यादीत समावेश आहे. 'ऑल दॅट ब्रीड्स'ने 32 वे स्थान पटकावले आहे. ब्रिटीश फिल्म इन्स्टिट्यूटचे साईट अँड साउंड मासिक दरवर्षी जगातील टॉप 50 चित्रपटांची यादी प्रसिद्ध करते. (हेही वाचा: एम्पायर मॅगझिनच्या 50 महान अभिनेत्यांच्या यादीत Shah Rukh Khan ला स्थान; असा मान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता)

शार्लोट वेल्सचे दिग्दर्शीय पदार्पण असलेल्या 'आफ्टर सन' या चित्रपटाला या यादीत पहिले स्थान मिळाले आहे. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित आहे. दरम्यान, आरआरआर हा चित्रपट 4 मार्च 2022 रोजी प्रदर्शित झाला. तो तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट 1920 च्या दशकातील अल्लुरी सीताराम राजू आणि कौमाराम भीम या दोन भारतीय क्रांतिकारकांवर आधारित आहे. या चित्रपटात आलिया भट्टही दिसली होती आणि अजय देवगणने छोटी भूमिका साकारली होती.