Kabhi Eid Kabhi Diwali या Salman Khan च्या आगामी सिनेमात Aayush Sharma साकारणार 'ही' भूमिका
Aayush Sharma, Salman Khan & Zaheer Iqbal (Photo Credits: Instagram)

Kabhi Eid Kabhi Diwali: 'राधे: द मोस्ट वॉन्टेट भाई' या सिनेमानंतर सलमान खान (Salman Khan) चा 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात सलमान आपला जीजा आयुष शर्मा (Aayush Sharma) सोबत झळकणार आहे. त्याचबरोबर आगामी सिनेमा 'कभी ईद कभी दिवाली' मध्ये पुन्हा एकदा सलमान-आयुष एकत्र दिसणार आहेत. त्यांच्यासोबत जहीर इकबाल (Zaheer Iqbal) देखील सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. अॅक्शन कॉमेडी सिनेमा 'कभी ईद कभी दिवाली' मध्ये आयुष आणि जहीर सलमान खानच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत दिसतील.

बॉलिवूड हंगामाच्या रिपोर्टनुसार, 'कभी ईद कभी दिवाली' हा सिनेमा तीन भावांची कहाणी आहे. यात मोठ्या भावाचे लग्न न झाल्याने लहान भावाचेही लग्न रखडले आहे. यात आयुष शर्मा आणि जहीर इकबाल यांनी सलमानच्या भावाची भूमिका साकारावी, हा खुद्द सलमानचाच प्लॅन होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Aayush Sharma (@aaysharma)

खऱ्या आयुष्यातील लोक सिनेमात असल्यास भावना व्यक्त करणे सोपे होते, असे सलमानला वाटते. सलमानचे आयुष आणि जहीर सोबत चांगले बॉन्डिंग असल्याने सिनेमातही त्यांची केमिस्ट्री चांगली रंगेल, अशी आशा करायला हरकत नाही. फरहाद समजी ही कथा रुपेरी पडद्यावर सादर करणार आहेत. (सलमान खान च्या 'राधे' चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 'इतकी' कमाई; जाणून घ्या चित्रपटाचे फर्स्ट डे कलेक्शन)

सिनेमात सलमान खान सोबत पूजा हेगड़े प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात ड्रामा, इमोशन, रोमांस आणि अॅक्शन असे सर्व काही पाहायला मिळेल, कुटुंबातील एकतेचा संदेश देणारा हा सिनेमा आहे.