Aamir Khan To Shift To Chennai: अभिनेता आमीर खान मुंबई सोडून चेन्नईला होणार शिफ्ट; जाणून घ्या का घेतला इतका मोठा निर्णय
Aamir Khan (Photo Credits: PTI)

बऱ्याच काळानंतर अभिनेता आमिर खान (Aamir Khan) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याचे प्रसिद्धीझोतात येणे हे कोणत्याही चित्रपटाशी संबंधित नसून त्याच्या वैयक्तिक आयुष्याशी संबंधित आहे. अभिनेता आमिर खान अचानक मुंबई शहर सोडून चेन्नईला (Chennai) शिफ्ट झाला आहे. आमिर खानच्या या अचानक निर्णयामुळे त्याचे चाहते हैराण झाले असून, त्यांना आमीरच्या या निर्णयामागचे कारण जाणून घ्यायचे आहे. आमिर खान आता पुढील दोन महिने चेन्नईत राहणार आहे.

अहवालानुसार, आमिर खानची आई झीनत हुसैन सध्या आजारी आहे. वृत्तानुसार, त्याच्या आईवर चेन्नईतील एका खासगी वैद्यकीय सुविधा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा परिस्थितीत आमिरला यावेळी जास्तीत जास्त आईसोबत राहायचे आहे. नुकतेच आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याला आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळे आपल्या आईच्या उपचारासाठी आमीर चेन्नईला शिफ्ट झाला आहे. (हेही वाचा: Raj Kundra ने पत्नी Shilpa Shetty पासून विभक्त होण्याच्या अफवांचं केलं खंडन; UT 69 अभिनेत्याने इंस्टावरील व्हिडिओ पोस्ट शेअर करत दिलं स्पष्टी

रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, आमिर झीनतवर उपचार सुरू असलेल्या मेडिकल सेंटरजवळील हॉटेलमध्ये राहणार आहे. या वर्षाच्या सुरुवातीला झीनतचा 89 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी आमिर आणि त्याच्या कुटुंबातील सदस्य त्याच्या जवळच्या मित्रांसह एकत्र आले होते.)वर्क फ्रंटबद्दल बोलताना आमिर खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो पुढच्या वर्षी प्रदर्शित होणाऱ्या 'सितारा जमीन पर' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची थीम त्याच्या 2007 मध्ये आलेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटासारखी असेल. याशिवाय नुकताच आमिरने त्याचा मुलगा जुनैद खानच्या ‘प्रीतम प्यारे या चित्रपटाची घोषणा केली होती. जुनैद खान या चित्रपटाचा निर्माता असेल असे त्याने सांगितले होते. त्याचबरोबर या चित्रपटात आमिरचा 5 मिनिटांचा खास कॅमिओ असणार आहे. आमिर शेवटचा करीना कपूरसोबत 'लाल सिंह चड्ढा'मध्ये दिसला होता.