A R Rahman Birthday: Lata Mangeshkar, Shreya Ghoshal, Anil Kapoor Send Him Warm Wishes. (Photo Credit: Twitter)

बॉलिवूडचा हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजम (Nepotism) आणि गढूळ झालेले वातावरण चव्हाट्यावर आले. यामध्ये नेपोटिजमला बळी पडलेले अनेक कलाकारही अगदी उघडपणे यावर भाष्य करु लागले. यात कंगना रनौत (Kangana Ranaut) ने या नेपोटिजमच्या विरोधात जी लढाई सुरु केली आहे त्यात अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे तर अनेकांनी टिका देखील केली आहे. यात आता ऑस्कर विजेते संगीत दिग्दर्शक तसेच गायक एर आर रहमान (A. R. Rahman) यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. बॉलिवूड माफियांमुळे हिंदीत काम मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रेडिओ मिर्ची शी बोलताना ए आर रहमान यांनी सांगितले "दिल बेचारा चे दिग्दर्शक मुकेश छाबड़ा माझ्याकडे आले आणि मी त्यांना 2 दिवसांत 4 गाणी दिली. त्यानंतर त्यांच्याशी बातचीत करत असताना लक्षात आले की, मुकेश यांना अनेक लोकांनी असा सल्ला दिला की ए आर रहमान यांना घेऊ नका. त्यानंतर सर्व ऐकल्यावर रहमान यांना कळाले की, बॉलिवूड मध्ये कमी ऑफर येण्याचे कारण बॉलिवूडमध्ये सक्रिय असलेली माफिया गँग कारणीभूत आहे."

हेदेखील वाचा- सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणी कंगना रनौत पोलिसांची करणार मदत करणार, वकिलांच्या माध्यमातून दिली माहिती

यामुळे की काय मी मागील 5 वर्षात केवळ 5 चित्रपट करु शकलो. माझ्या चाहत्यांच्या माझ्याकडून ब-याच अपेक्षा आहेत. त्यामुळे अनेक लोक जे माझा हा विश्वास तोडण्याच प्रयत्न करत आहेत. मात्र मला स्वत:वर विश्वास आहे की, मी जे काही करेल त्यात ईश्वराची संमती असेल.त्यामुळे मी माझे काम चालूच ठेवले आहे असेही ए आर रहमान म्हणाले.