72 Hoorain (photo credit- twitter)

72 Hoorain: ट्रेलर लॉंच झाल्यापासून 72 हूरें' वादाच्या भोवऱ्या अडकला आहे. ह्या चित्रपटा बद्दल चांगलीच चर्चा रंगली आहे. हा चित्रपट येत्या ७ जूलै रोजी प्रदर्शित होणार आहे. JNU येथे प्रदर्शित होणार असल्याचे घोषित केले आहे.  चित्रपटाचा ट्रेलर पाहून लोकांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात  केली आहे.या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संजय पूरण सिंह (Sanjay Puran Singh) यांनी केलं आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (जेएनयू) कॅम्पसमध्ये या सिनेमाच्या विशेष स्क्रीनिंगचे आयोजन करण्यात आले आहे.४ जुलै रोजी जेएनयू ला प्रदर्शित करण्यात येणार आहे.   ह्या चित्रपटाचे जेएनयू च्या कॅम्पसमध्ये प्रदर्शित करण्यामागचे कारण म्हणजे, विद्यापीठातील काश्मिरी मुस्लिम आणि इतर विद्यार्थ्यांसाठी चित्रपटात दाखविलेल्या दहशतवादी घटनांच्या सत्याबाबत व्यक्त होण्याची सुवर्णसंधी आहे.नकारात्मक गोष्टीमुळे वाद वाढत चालले आहे. असे चित्र दिसत आहे.

चित्रपटाचा ट्रेलर पाहून अनेकांनी टीका केल्या आहेत.मौलाना साजिद रशीद खान यांनीदेखील '72 हुरैन' या सिनेमावर आक्षेप घेतला आहे.  या चित्रपटात धार्मिक गोष्टी चुकीच्या दाखवल्या आहेत असा आरोप केला आहे. या चित्रपटात दहशवाताच्या गंभीर विषयात हात घातल्याचे समोर आले आहे. या चित्रपटातील काही गोष्टीमुळे वाद होतोय असे समोर आले आहे.