69 व्या फिल्मफेयर पुरस्कारांची (69th Filmfare Awards) घोषणा झाली असून नॉमिनेशनमध्ये शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) आणि 'डंकी' (Dunki) या सिनेमांसह रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) 'अॅनिमल' (Animal) सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत. 69 वा फिल्मफेयर पुरस्कार सोहळा गुजरातमधील गांधीनगरमध्ये (Gandhi Nagar) होणार आहे. या पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी हजेरी लावणार आहेत. हिंदी सिनेसृष्टीसाठी हा महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो.

69 व्या फिल्मफेअर पुरस्काराच्या नामांकनाची यादी समोर आली असून यामध्ये रणबीर कपूरच्या अॅनिमल चित्रपटाला सर्वाधिक 19 नामांकन प्राप्त झाले आहेत. यानंतर शाहरुख खानच्या जवान आणि डंकीचा नंबर आहे.

पाहा पोस्ट -

सर्वोत्कृष्ट चित्रपट

- 12 वीं फेल

- अॅनिमल

- जवान

- ओह माय गॉड 2

- पठाण

- रॉकी और रानी की प्रेम कहानी

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक

- अमित राय (ओह माय गॉड)

- अॅटली (जवान)

- करण जोहर (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

- संदीप रेड्डी वांगा (अॅनिमल)

- सिद्धार्थ आनंद (पठाण)

- विधु विनोद चोप्रा (12 वीं फेल)

सर्वोत्कृष्ट अभिनेता

- रणबीर कपूर (अॅनिमल)

- रणवीर सिंह (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

- शाहरुख खान (डंकी)

- शाहरुख खान (जवान)

- सनी देओल (गदर 2)

- विकी कौशल (सॅम बहादुर)

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री

आलिया भट्ट (रॉकी और रानी की प्रेम कहानी)

भूमी पेडणेकर (थँक यू फॉर कमिंग)

दीपिका पादुकोण (पठाण)

कियारा आडवाणी (सत्यप्रेम की कथा)

रानी मुखर्जी (मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)

तापसी पन्नू (डंकी)

फिल्मफेयर अवॉर्ड्स 2024' करण जोहर , आयुष्मान खुराना आणि मनीष पॉल होस्ट करणार आहेत. 27-28 जानेवारी 2024 दरम्यान हा पुरस्कार सोहळा पार पडणार आहे.