50 Most Desirable Women 2019: टाइम्सच्या 'मोस्ट डिजायरेबल वूमन' च्या यादीमध्ये Disha Patani ठरली अव्वल; दीपिका पादुकोण, कतरिना कैफ, आलिया भट्ट यांना टाकले मागे (See List)
Disha Patani (Photo Credits: Instagram)

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) केवळ अभिनयच करत नाही तर तिच्या सौंदर्याबद्दल, फिटनेसबाबत बरीच चर्चेत आहे. तिने अतिशय अल्पावधीत लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केले आहे. दिशाने 2016 मध्ये एमएस धोनी या चित्रपटाद्वारे फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. अवघ्या चार वर्षात ती लोकांची पसंती बनली आहे. आता तिने दीपिका पादुकोण, कतरिना कैफ आणि आलिया भट्ट सारख्या अभिनेत्रींना मागे टाकून, वर्ष 2019 चे टाइम्स मोस्ट डिजायरेबल वूमनचे (Most Desirable Women 2019) विजेतेपद जिंकले आहे. या यादीत तिने पहिले स्थान मिळविले आहे.

याबाबत ई-टाईम्सशी बोलताना दिशा म्हणाली, 'मला चाहत्यांकडून मिळणाऱ्या या प्रेमाबद्दल मी कृतज्ञ आहे. ही एक सुंदर भावना आहे. हे मजेदार आहे. परंतु मी अजूनही पूर्वीसारखी एक टॉम बॉय आहे.' या यादीमध्ये दिशानंतर सुमन राव, कॅटरिना कैफ, दीपिका पादुकोण, वर्तिका सिंह, कियारा अडवाणी, श्रद्धा कपूर, यामी गौतम, आदिती राव हैदरी, जॅकलिन फर्नांडिस, शिवानी जाधव, आलिया भट्ट, तारा सुतारिया, गायत्री भारद्वाज, कृती सनन यांची नावे समाविष्ट आहेत. तर छोट्या पडद्यावरील हिना खान, जेनिफर विंगेज, एरिका फर्नांडिस, मौनी रॉय यांना यामध्ये स्थान मिळाले आहे.  या सर्वेक्षणात सेलिब्रिटींच्या लुक, आत्मविश्वास, प्रतिभा आणि शैलीनुसार त्यांना स्थान देण्यात आले आहे.

या यादीतील काही नवीन नावे म्हणजे, शिवानी जाधव (Femina Miss Grand India 2019), तारा सुतारिया, शेफाली सूद (Miss Diva Supranational 2019), समंथा अक्केनी (Hyderabad Times Most Desirable Woman 2019), शांवी श्रीवास्तव (Bangalore Times Most Desirable Woman of 2019), श्रेया शंकर (Femina Miss India United Continents 2019), नुसरत जहां (Calcutta Times Most Desirable Woman of 2019), तापसी पन्नू, अनन्या पांडे, भूमि पेडणेकर, साई मांजरेकर आणि नेहा पेंडसे (Maharashtra's Most Desirable Woman for 2019) यांचा समावेश आहे. (हेही वाचा: बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी ने शेअर केला ब्लॅक बिकनीमधील हॉट फोटो; Watch Photo)

दरम्यान, नुकतेच दिशा पाटनी ‘मलंग’ चित्रपटात दिसली होती. तिच्याशिवाय यामध्ये अनिल कपूर, कुणाल खेमू आणि आदित्य रॉय कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. ती आता सलमान खानच्या चित्रपटात ‘राधेः तुम्हारा मोस्ट वॉन्टेड भाई’ मध्ये दिसणार आहे. याआधी दिशाने सलमानबरोबर भारत चित्रपटात काम केले होते.