Kangana Ranaut Net Worth: 12 वी उत्तीर्ण कंगना राणौतकडे 90 कोटी रुपयांची संपत्ती; अभिनेत्रीकडे 3 आलिशान गाड्या, 7 किलो सोनं आणि 60 किलो चांदीचे दागिने
Kangana Ranaut (PC - X/ @KanganaTeam)

Kangana Ranaut Net Worth: देशातील सर्वात लोकप्रिय लोकसभा मतदारसंघ असलेल्या मंडी येथील भाजप उमेदवार (BJP Candidate) अभिनेत्री कंगना राणौत (Kangana Ranaut) ही करोडोंच्या मालमत्तेची मालक आहे. 12वी उत्तीर्ण कंगनाने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. कंगनाकडे सुमारे 91,66,31,239 कोटी रुपयांची जंगम आणि स्थावर मालमत्ता आहे. यातील जंगम मालमत्ता 28,73,44,239.36 कोटी रुपये आहे. कंगना राणौतकडे बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज बेंझ कार आहे. याशिवाय कंगना 3.91 कोटी रुपयांच्या मर्सिडीज-मेबॅच जीएलएस 600 4 एमची मालकीण आहे.

7 किलो सोने आणि 60 किलो चांदीचे दागिने -

कंगनाकडे 5 कोटी रुपयांचे 6.70 किलो सोन्याचे दागिने, 50 लाख रुपयांचे 60 किलो चांदी आणि 3 कोटी रुपयांचे हिऱ्यांचे दागिने आहेत. कंगनाची रिअल इस्टेट आहे. ज्याचे बाजारमुल्य 62,92,87,000 कोटी रुपये आहे. यामध्ये मुंबई आणि मनालीमधील घरे, जिरकपूरमधील व्यावसायिक इमारती आणि इतर स्थावर मालमत्तांचा समावेश आहे. (हेही वाचा -Shekhar Suman On Kangana Ranaut: कंगना रनौत यांनी बोलावल्यास निवडणूक प्रचारास जाणार- शेखर सुमन (Watch Video))

कंगनावर आठ गुन्हे दाखल -

कंगनाविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तीनसह एकूण आठ गुन्हे दाखल आहेत. तथापी, मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार कंगना रणौत यांनी मंगळवारी दुपारी विरोधी पक्षनेते जयराम ठाकूर, भाजप प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल आणि आई आशा रणौत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. पहाटे भांबला यांच्या वडिलोपार्जित घरी आई आणि मुलगी कंगनाची आरती करण्यात आली. कंगनाने तिच्या आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. आई आशा राणौत आणि वडील अमरदीप रणौत यांनी आपल्या मुलीला विजयी होण्यासाठी आशीर्वाद दिला. (वाचा -Kangana Ranaut Beef Controversy: 'मी गोमांस खात नाही, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे', भाजप उमेदवार कंगना रणौतने गोमांस वादावर दिले स्पष्टीकरण)

मंडीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कंगनाने मंडीच्या पडडल मैदानापासून उपायुक्त कार्यालयापर्यंत रोड शो केला. नंतर सेरीच्या मंचावर जाहीर सभा झाली. उपायुक्त कार्यालय परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कंगनाने सांगितले की, तिच्या उमेदवारीबाबत संपूर्ण मंडी लोकसभा मतदारसंघात उत्सवाचे वातावरण आहे. फिल्मी दुनियेत त्यांनी कितीही नाव कमावले असले तरी आता राजकारणातही मोठे नाव कमावण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आज सर्वात मोठ्या पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असल्याचंही कंगनाने म्हटलं आहे.