अभिनता आणि विनोदी कलाकार शेखर सुमन यांनी नुकताच भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या प्रवेशानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कंगना रनौंत यांनी निवडणूक प्रचारास बोलावल्यास आपण नक्की जाऊ. प्रचारास जाणे हे माझे कर्तव्य आणि हक्कही असल्याचे ते म्हणाले.

संजय लीला भन्साळी यांच्या हीरामंडी: द डायमंड बझारमध्ये अलिकडेच शेखर सुमन यांचे दर्शन झाले. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर बोलताना ते म्हणाले, मला कालपर्यंत कल्पाना नव्हती की, मी आज या ठिकाणी असेन. आयुष्यात अनेक गोष्टी जाणूनबुजून किंवा नकळत घडतात. मी येथे खूप सकारात्मक विचार घेऊन आलो आहे. मी देवाचे आभार मानू इच्छितो की त्याने मला इथे (भाजपात) येण्याची आज्ञा दिली. हा निर्णय घेण्यापूर्वी वेब सीरिज हिट होण्याची वाट पाहत होतो, असेही सुमन यांनी म्हटले. (हेही वाचा, Actor Shekhar Suman joins BJP: अभिनेते शेखर सुमन यांनी केला भाजपा पक्षात प्रवेश (Watch Video))

व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)