चेक बाऊन्सप्रकरणी अटकेत असलेला बिग बॉस मराठी 2 (Bigg Boss Marathi) चा स्पर्धक अभिजित बिचुकलेला (Abhijit Bichukale) दिलासा मिळाला आहे. मात्र खंडणीच्या प्रकरणात अभिजित बिचुकले सध्या सातारा पोलिसांच्या अटकेत आहे. बिचुकलेच्याविरोधात तक्रार करणार्या फिरोज पठाण (Firoz Pathan) या फिर्यादीनेही तक्रार मागे घेतली आहे. त्यामुळे आता अभिजित बिचुकलेंची लवकरच कारागृहातून सुटका होऊ शकते. सध्या अभिजित बिचुकले यांची कळंबा कारागृहात रवानगी केली असून कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यानंतर त्याची सुटका होऊ शकते. कारागृहातून बाहेर पडल्यानंतर बिचुकले पुन्हा बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार का? हे पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे.अभिजित बिचुकले यांची अटक झाल्यानंतर प्रतिक्रिया म्हणाले 'माझी अटक म्हणजे ..!'
बिग बॉसच्या घरात पुन्हा एन्ट्री घेणार अभिजित बिचुकले?
मागील आठवड्यात अभिजित बिचुकले नॉमिनेशनमध्ये होते. त्यामुळे कदाचित तेच आऊट झाले असावेत आणि त्यानंतर अटक झाली असावी असं रसिकांना वाटलं होतं. मात्र मागील आठवड्यात बाप्पा म्हणजे विद्याधर जोशी आऊट झाले त्यामुळे कायदेशीर बाबीतून वाट काढत अभिजित बिचुकले पुन्हा घरात एन्ट्री घेऊ शकतात.
बिग बॉसच्या घरातही एन्ट्री झाल्यापासून अभिजित बिचुकले आणि वाद हे समीकरण जुळलं आहे. महिलांबद्दल आक्षेपार्ह बोलणं, शिवीगाळ करताना अर्वोच्च भाषेचा वापर करणं अशा वागण्यामुळे घरातील सदस्य, बिग बॉसचे होस्ट महेश मांजरेकर यांच्यासह अनेक रसिकांनी आक्षेप नोंदवला होता. मुख्यमंत्र्यांकडे मागणी करून त्याला बिग बॉसच्या घरातून हाकलावे यासाठी मागणीदेखील करण्यात आली आहे. Bigg Boss Marathi 2: अभिजीत बिचुकले यांना बिग बॉस च्या घराबाहेर काढण्यासाठी भाजपा माजी नगरसेविका रितू तावडे यांची मुख्यमंत्र्यांकडे धाव
बिग बॉसच्या सेटवरून अभिजित बिचुकलेला 21 जूनला अटक झाली होती. सातारा पोलिसांनी आरे कॉलनी पोलिसांच्या मदतीने ही अटक मुंबईतील बिग बॉसच्या सेटवरून केली.