बिग बॉसच माझा पहिला नवरा, सीझन 1 मध्ये लग्न झाल्याचा राखी सावंत हिचा दावा (Watch Video)
Rakhi Sawant (Photo Credits-Instagram)

बॉलिवूडची ड्रामा क्विन राखी सावंत (Rakhi Sawant) ही सध्या सोशल मीडियात फारच चर्चेचा विषय ठरला आहे. कारण राखी सावंत हिने लग्न केल्याच्या गोष्टीचा खुलासा केल्यानंतर तिचा नवरा नेमका कोण हे कळले नाही आहे. याच पार्श्वभुमीवर राखी सावंत हिने अजून एक धक्कादायक खुलासा केला असून बिग बॉसच माझा पहिला नवरा असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही तर सीझन 1 मध्येच माझे लग्न झाल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आता राखी हिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात फार व्हायरल होत आहे.

व्हिडिओ मध्ये राखी सावंत हिने असे म्हटले आहे की, माझे लग्न झाले आहे, परंतु काही लोक माझा पाठलागच सोडत नाही आहेत. मित्रांनो मला असे वाटते की तुम्ही सर्वांनी बिग बॉस पहावे लागणार आहे. तुम्ही पाहू शकता राखी सावंत हिच्याबाबत कशी पद्धतीची नाचक्की केली जात आहे. त्यापुढे राखीने असे ही म्हटले आहे की, बिग बॉस तुम्हाला तर मी खुपच आवडते. एवढेच नाही तुम्ही तर माझे पहिले पती होतात. आपले लग्न बिग बॉसच्या 1 ल्या सीझन मध्येच झाले होते.(Watch Video: राखी सावंत चे हे टॉपलेस व्हिडिओ पाहिलेत का?)

 

View this post on Instagram

 

#bigboss13

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी बीबी ट्रान्सपोर्ट टास्क दरम्यान शहनाज गिल सिद्धार्थ शुक्ला आणि असीम यांच्यामध्ये वाद झाल्याचे दिसून आले. त्यानंतर शहनाज अचानक सिद्धार्थ याची टीम सोडून पारसच्या टीममध्ये सहभागी झाली. त्यानंतर शेहनाज हिची तिच्याच मित्रमंडळींसोबत वाद झाल्याने शेफाजी जरीवाला हिने तिला पंजाबची राखी सावंत असे म्हटले आहे. त्यानंतर राखी सावंत हिने बिग बॉसचे सदस्य, बिग बॉस आणि सलमान खान याच्याकडे नाराजी व्यक्त करत त्यावर न्याय मिळायला हवा अशी मागणी करत आहे.