बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर कमी वेळात अधिक प्रसिद्ध मिळवणारी अभिनेत्री म्हणून भूमि पेडणेकर (Bhumi Pednekar) हिच्याकडे पाहिले जाते. भूमिने उत्कृष्ठ कलाकारीच्या जोरावर प्रक्षेकांचे मन जिंकली आहेत. तसेच तिने दम लगा के हइशा या बॉलिवूड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. टॉयलेट एक प्रेम कथा या चित्रपटामुळेही भूमि पेडणेकर अधिक चर्चेत आले होती. सध्या भूमि पेडणेकर हिच्या हिट चित्रपटापेक्षा तिच्या बोल्ड अंदाजात शूट केलेल्या फोटोची अधिक चर्ची होऊ लागली आहे. नुकतेच भूमि पेडणेकर हीने आपला टॉपलेस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यातच तिचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच भूमिची फोटोग्राफर डब्बू रतनानी हीचीही चर्चा होऊ लागली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री भूमि पेडणेकरने नुकतीच प्रसिद्ध फोटोग्राफर डब्बू रतनानी यांच्या दिनदर्शिकासाठी फोटोशूट केले होते. डब्बू रतनानी यांच्या दिनदर्शिकासाठी भूमि पहिल्यांदात टॉपलेस अंदाजात दिसली होती. यामुळे भूमि पेडणेकर ही चर्चेचा विषय ठरली होती. तिचा टॉपलेस फोटोने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला होता. तसेच या फोटोशूटमुळे तिला अनेकांनी ट्रोलही केले होते. यातच भूमिचा नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यंदाचा तिचा फोटो अधिक बोल्ड आहे. या फोटोमध्ये भूमिने डीप नेक गाऊन परिधान केला आहे. हे देखील वाचा- मराठी चित्रपट 'मुळशी पॅटर्न' चा येणार रिमेक, सलमान खान दिसणार 'या' प्रमुख भूमिकेत तर आयुष शर्मा बनणार गँगस्टर
भूमि पडेणेकरचा व्हायरल फोटो-
भूमि पेडणेकरचा नवा लूक-
भूमि शिवाय कबीर सिंह या चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर आलेली कियारा आडवाणीने देखील डब्बू रतनानी यांच्या दिनदर्शिकासाठी टॉपलेस फोटो शूट केले होते. यामुळे नेटकऱ्यांनी किरायाला सोशल मीडियावर व्हायरल केले होते. तसेच त्यांच्या फोटोचे अनेक मिम्सदेखील तयार केलेले दिसले. मागच्या आठवड्याच डब्बू रतनानी यांनी त्यांच्या दिनदर्शिकाचे अनावरण केले होते. नेहमीप्रमाणे यंदाही डब्बू रतनानी यांच्या दिनदर्शिका वेगळा विषय दिसला. यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, विक्की कौशल आणि अनन्या पांडे यांचाही समावेश आहे.