Bharat Trailer: सलमान खान आणि कतरिना कैफच्या दमदार अभिनयाने सजला 'भारत'चा जीवन प्रवास; ईदच्या मुहूर्तावर होणार प्रदर्शित (Video)
Bharat Trailer (Photo Credit : Youtube)

अखेर सलमान खान (Salman Khan) च्या बहुप्रतीक्षित भारत (Bharat) चित्रपटाचा ट्रेलरचा प्रदर्शित झाला आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाची चर्चा बरेच महिने चालू होती. चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर तर याची उत्सुकता अजूनच वाढली. आता या ट्रेलरमुळे बऱ्याच गोष्टी समोर आल्या आहेत. सलमानच्या दमदार आवाजाने या ट्रेलरची सुरुवात होते. सलमान खानच्या भूमिकेचे नाव यात भारत आहे, अशाप्रकारे भारत देश आणि सलमान यांच्या जीवनाचा प्रवास या चित्रपटात दिसणार आहे. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे.

या चित्रपटात भारत स्वतंत्र्य झाल्यानंतरच्या विविध टप्प्यांसोबत, एका भारतीयाचे बदलणारे आयुष्य दाखवण्यात आले आहे. सलमानच्या जीवनातील विविध फेज या ट्रेलरमध्ये दिसून येतात. यात सर्वात आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे जीवनाच्या विविध टप्प्यांवरील सलमानचे वेगवेगळे लूक्स. पिरिएड फिल्म असणारा ‘भारत’ सिनेमा 'Ode to My Father' या कोरियन सिनेमाचा रिमेक आहे.

(हेही वाचा: भारत सिनेमाचं मोशन पोस्टर आऊट! 'सलमान खान' ने शेअर केला एका दशकातील 5 हट्के लुक्स मधील प्रवास (Watch Video))

या चित्रपटात सलमान खान सोबत कतरीना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहे. सोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पटानी असे अनेक कलाकार आहेत. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याआधी अली आणि सलमान खान या जोडीने ‘सुलतान’आणि ‘टायगर जिंदा है’ हे दोन सुपरहिट चित्रपट दिले आहेत. आता भारत हा चित्रपट हा सिनेमा यंदा ईदच्या मुहूर्तावर म्हणजे 5 जून 2019 दिवशी प्रदर्शित होणार आहे.