Bharat Box Office 1st Day Collection: दरवर्षीप्रमाणे या ईदला (Eid) देखील सलमान खानचा (Salman Khan) बहुप्रतीक्षित ‘भारत’ (Bharat) चित्रपट प्रदर्शित झाला आहे. गेले कित्येक आठवडे भारतचे जोरदार प्रमोशन चालू होते. चित्रपटाचा ट्रेलर, गाणी, संवाद, सलमानचे लुक्स अशा सर्वच गोष्टींची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर 5 जूनला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला, आणि पहिल्याच दिवशी प्रेक्षकांनी हा चित्रपट डोक्यावर घेतला. पहिल्या दिवशी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मुसंडी मारत तब्बल 42.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
#Salmania grips the nation... #Bharat storms the BO... Proves *yet again* Salman Khan is the biggest crowd puller... #Bharat opens much bigger than Salman - Ali Abbas Zafar’s #TigerZindaHai [₹ 34.10 cr] and #Sultan [₹ 36.54 cr]... Wed ₹ 42.30 cr. India biz.
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2019
या कमाईने सलमान खानचा जुना रेकॉर्ड मोडीत काढून, भारत हा त्याचा आजपर्यंत पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. याआधी सुलतान पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला होता. त्याने पहिल्या दिवशी 36.54 कोटी रुपयांची कमाई केली होती. तरण आदर्श यांनी सलमानच्या दबंगपासूनच्या चित्रपटांची ओपनिंग कमाई ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोबतच भारत हा पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला आहे. 'ठग्ज ऑफ हिंदोस्तान' ने पहिल्याच दिवशी 52 कोटी रूपयांचा गल्ला जमवला होता. (हेही वाचा: सलमान खान याचा 'भारत' सिनेमा TamilRockers वर लीक)
Salman Khan and #Eid... *Day 1* biz
2010: #Dabangg ₹ 14.50 cr
2011: #Bodyguard ₹ 21.60 cr
2012: #ETT ₹ 32.93 cr
2014: #Kick ₹ 26.40 cr
2015: #BajrangiBhaijaan ₹ 27.25 cr
2016: #Sultan ₹ 36.54 cr
2017: #Tubelight ₹ 21.15 cr
2018: #Race3 ₹ 29.17 cr
2019: #Bharat ₹ 42.30 cr
— taran adarsh (@taran_adarsh) June 6, 2019
या चित्रपटात सलमान खान सोबत कतरीना कैफ (Katrina Kaif) मुख्य भूमिकेत आहे. सोबत जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पटानी असे अनेक कलाकार आहेत. अली अब्बास जफर (Ali Abbas Zafar) यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. याआधी अली आणि सलमान खान या जोडीने ‘सुलतान’आणि ‘टायगर जिंदा है’ हे दोन सुपरहिट चित्रपट दिले आहेत.