सलमान खान (Salman Khan) आणि कैतरिना कैफ (Katrina Kaif) यांचा 'भारत' (Bharat) सिनेमा तमिळरॉकर्स (TamilRockers) आणि अन्य पायरेसी वेबसाईट (Piracy Websites) वर लीक झाला आहे. सिनेमा प्रदर्शित होऊन एकच दिवस झाला असून ऑनलाईन पायरेसी माफियांनी या सिनेमाची पायरेटेड कॉपी इंटरनेटपर लीक केली आहे. त्यामुळे 'भारत' सिनेमा तुम्ही आता फ्री मध्ये डाऊनलोड केला जाईल.
इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, वर्ल्ड कप 2019 (World Cup 2019) सुरु झाल्यामुळे सिनेमाच्या बॉक्स ऑफिसवर कलेक्शनवर परिणाम होण्याची शक्यता होती. यातच सिनेमा लीक होणे हा निर्मात्यांसाठी मोठा झटका आहे. ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भारत' सिनेमाची क्रेझ पाहता सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल, अशी आशा होती. मात्र लीक झाल्यामुळे सिनेमाच्या कमाईवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सिनेमांची पायरसी थांबवण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करत आहे. मात्र यात सरकार अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. अलिकडेच केंद्र सरकारने सिनेमेटोग्राफी अॅक्ट 1952 (Cinematography Act 2019) संशोधन करुन पायरेसी आणि सिनेमागृहातील कॅमकॉर्डिंग (Camcording) अनधिकृत असल्याचे जाहीर केले आणि असे करणाऱ्यांना कठोर शासन करावे असे सांगण्यात आले. असे असूनही पायरसी माफिया कायदे तोडून सिनेमे ऑनलाईन लीक करत आहेत.
'भारत' सिनेमात सलमान-कैतरिना शिवाय सुनील ग्रोवर, दिशा पटानी आणि जॅकी श्रॉफ या कलाकारांच्याही प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले आहे.