![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/11/Amitabh-Bachchan-380x214.jpg)
Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन हे मुंबईत सतत नवीन प्रॉपर्टी खरेदी करत असतात. गेल्या वर्षी अयोध्येत राम मंदिर उभारणीवेळी त्यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली होती. आता देखील अमिताभ यांनी तीन नवीन ऑफिस खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी अभिषेक बच्चन याने मुंबईच्या बोरीवली परिसरात 6 फ्लॅट विकत घेतले होते. अभिषेकने इथल्या ओबेरॉय रियल्टीच्या प्रतिष्ठित ओबेरॉय स्काय सिटी प्रकल्पात सहा अपार्टमेंट्स विकत घेतले आहेत. Zapkey.com ने मिळवलेल्या मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, या खरेदीवर अभिनेत्याने तब्बल 15.42 कोटी रुपये खर्च केले आहेत. (हेही वाचा: Abhishek Bachchan Buys Six Apartments In Borivali: अभिषेक बच्चनने बोरीवलीमध्ये खरेदी केले तब्बल सहा लक्झरी अपार्टमेंट्स- Reports)
अंधेरीतील पॉश एरिया वीरा देसाई रोड जवळील वीर सावरकर सिग्नेचर बिल्डींगमध्ये अमिताभ यांनी ही तीन ऑफिसं खरेदी केली आहेत. फ्लोरटॅप.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, अमिताभ यांनी या तीन ऑफिस यूनिटसाठी 59.98 कोटी रुपये मोजले आहेत. या तिन्ही ऑफिसचा एरिआ हा 8429 क्वेअर फूट आहे. अमिताभ बच्चन यांची ही डील 20 जून 2024 रोजी झाली आहे. त्यासाठी 3.75 कोटी रुपये स्टॅम ड्यूटी त्यांनी भरली आहे.
अभिषेक बच्चन यांनी खरेदी केले फ्लॅट
अभिषेक बच्चन यांनी बोरिवलीतील ओबेरॉय रियॅल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी या प्रकल्पात 15.42 कोटी रुपयांना सहा फ्लॅट खरेदी केले आहेत. बोरिवली पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गालगत असलेल्या या इमारतीच्या 57 व्या मजल्यावर हे सहा अपार्टमेंट आहेत. बॉलिवूड अभिनेत्याने 31,498 रुपये प्रति चौरस फूट दराने एकूण 4,898 चौरस फूट रेरा कार्पेटचे हे फ्लॅट खरेदी केले आहेत. त्यात 10 कार पार्किंगची सुविधा आहे.
अमिताभ बच्चन यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर, कल्कि 2898 एडी या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. हा चित्रपट 27 जून ला प्रदर्शित होणार आहे. अमिताभ यांच्यासोबत या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पादूकोण आणि प्रभास महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.