Aditya Paudwal Dies at 35:  प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाड यांचा मुलगा आदित्य पौडवाल चे वयाच्या 35व्या वर्षी निधन
Aditya Paudwal | FB

प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाड (Anuradha Paudwal) यांचा मुलगा आदित्य पौडवाल (Aditya Paudwal) चे वयाच्या 35 व्या वर्षी निधन झाले आहे. तो मूत्रपिंडाच्या आजाराने (Kidney Failure) त्रस्त होता. दरम्यान इतक्या कमी वयात त्याचे निधन झाल्याने पौडवाल कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आई-वडिलांप्रमाणेच आदित्य देखील संगीत क्षेत्रामध्ये काम करत होता. नुकताच त्याने अल्बम रिलीज केला होता. मात्र मूत्रपिंडाच्या आजाराने त्याची झुंज अयशस्वी ठरली आहे. सर्वात कमी वयाचा संगीत दिग्दर्शक म्हणून आदित्य पौडवालची 'लिम्का बुक ऑफ रिकॉर्ड्स' मध्ये नोंद करण्यात आली होती.

उमागणपती हा त्याचा शेवटचा अल्बम ठरला आहे. दरम्याने काही दिवसांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात तो प्रसिद्ध केला होता. तोच त्याचा शेवटचा अल्बम ठरला आहे. यामध्ये अनुराधा पौडवाल यांचा स्वरसाज आहे. तर आदित्यने संगीताची जबाबदारी स्वीकरली होती.  अनुराधा पौडवाल यांची दोन्ही मुलं संगीतक्षेत्रामध्ये काम करत होती. आदित्य हा संगीतकार, म्युजिक अरेंजर म्हणून काम करत होता.  Aditya Paudwal Passes Away: 35 व्या वर्षी जगाचा निरोप घेणारा अनुराधा पौडवाल यांचा लेक आदित्य चा Limca Book Of World Record मधील समावेश ते 'ठाकरे' सिनेमाचं संगीत, असा होता प्रवास

मीडीया रिपोर्ट्सनुसार आदित्यचं निधन आज सकाळी मुंबईमध्ये झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. पण या उपचारांना यश आले नाही आणि तो अकाली या जगातून निघून गेला.

अनुराधा पौडवाल यांचे पती आणि आदित्यचे वडील अरुण पौडवाल यांचा मृत्यू 1991 साली झाला होता. ते देखील मराठी संगीतकार होते. काही काळ त्यांनी संगीत दिग्दर्शक एस. डी. बर्मन यांचे बरोबर काम केले. अनुराधा आणि अरूण पौडवाल यांची मुलगी कविता पौडवाल हीगायिका बनली आहे तर मुलगा आदित्य हा संगीतकार म्हणून काम करत होता.