तुमच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीनुसार गाडीचा इन्शुरन्स किती असणार हे ठरवले जाणार, जाणून घ्या कसे
Representational Image | Driving (Photo Credits: Unsplash)

तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या ड्रायव्हिंगच्या पद्धतीनुसार गाडीचा इन्शुरन्स प्रिमिअम ठरवला जाणार आहे. येत्या काही काळात इन्शुरन्स कंपन्या कार मॉडेलच्या आधारवर नाही तर तुम्ही गाडी कशी चालवता त्यानुसार इन्शुरन्स काढणार आहेत. म्हणजेच जर तुम्ही खराब ड्रायव्हिंग करत असल्यास त्याच्या इन्शुरन्ससाठी चालकांना अधिक पैसे द्यावे लागणार आहेत.इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) अंतर्गत कंपन्यांना ड्रायव्हिंगच्या पद्धतीनुसार प्रिमिअम सुविधा मिळणार आहे. इंन्शुरन्स कंपन्या कारमध्ये लावण्यात आलेले सेंसर्स आणि टेलिमॅटिक्स डिव्हाईसच्या मदतीने तुमच्या गाडी चालवण्याची पद्धत ओळखू शकणार आहे. यासाठी UBU असे नाव देण्यात आले आहे.

UBI मुख्यत्वे ड्रायव्हिंग संबंधित पॅटर्न रेकॉर्ड करणारे टेलिमॅटिक्स डिव्हाइससंबंधित जमा केलेल्या डेटाच्या माध्यमातून ठरण्यात येते. यामध्ये जोराने एक्सेलेटर दाबणे आणि फास्ट ड्रायव्हिंग यासह अन्य गोष्टीसुद्धा समाविष्ट आहेत. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट यांच्या अनुसार, हाय अॅन्ड सिडेन कारमध्ये कमीतकमी 70 सेंसर असतात.जर एखादी व्यक्ती अॅक्सेलेटर जोरात दाबल्यानंतर लांबचा पल्ला गाठता येतो. त्यानुसार व्यक्तीला जास्त प्रिमियम भरावा लागणार आहे. तसेच एखादा व्यक्ती कमी अंतर आणि धिम्या गतीने गाडी चालवत असल्यास त्याला इन्शुरन्स मध्ये सूट देण्यात येणार आहे. एवढेच नाही त्या चालकाला सुरक्षित ड्रायव्हर म्हणून घोषित केले जाणार आहे.(वाहनाचा विमा काढा नाहीतर वाहनांवर येणार जप्ती, दिवाकर रावते यांचा इशारा)

 जुलै महिन्यापासून  थर्ड पार्टी विमाच्या (Third party insurance) किंमती वाढल्याने गाड्यांच्या किंमतीमध्येही वाढ झाली आहे. चारचाकी गाड्यांच्या विम्यामध्ये 12.5 टक्के तर दुचाकी गाड्यांच्या विम्यामध्ये 21 टक्के वाढ झाली आहे. यामुळेच थंडावलेल्या गाड्यांच्या किंमती वाढणार आहेत. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणा (IRDA) कडून ही वाढ करण्यात आली आहे. नवीन गाडी खरेदी करताना दुचाकीसाठी 5 वर्षे तर चारचाकीसाठी 3 वर्षांचा विमा घेणे आवश्यक आहे.