वाहनाचा विमा काढा नाहीतर वाहनांवर येणार जप्ती, दिवाकर रावते यांचा इशारा
प्रतिकात्मक फोटो | Driving (Photo Credits: Unsplash)

परिवहन मंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांनी वाहन चालकांना वाहनाचा विमा (Insurance)  न काढल्यास वाहन जप्ती होईल असा इशारा दिला आहे. तर दारु पिऊन गाडी चालवल्यास पोलिसांनी पकडल्यास सहा महिन्याकरिता वाहन परवाना ही रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

परिवहन आणि वाहतूक पोलिसांची सोमवारी एक महत्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत वाहनचालकांनी विमा न काढल्यास किंवा वाहतूक नियमांविरुद्ध वागल्यास कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे ठरविले आहे. राज्यात थर्ड पार्टी विमा अनिवार्य असला तरीही देशातील अध्याहून जास्त वाहाने सुरक्षित नाहीत. यामुळे थर्ड पार्टी विम्यावरही गदा येण्याची शक्यता आहे.

ट्रक मालकांच्या संघटनेने सरकारकडे थर्ड पार्टी विम्याची रक्कम संपूर्ण माफ करावी अषी मागणी केली होती. या मागणीवर योग्य तो निर्णय घेतला जाईल असे सरकारने ट्रक मालकांच्या संघटनेला आश्वासन दिले होते. तसेच डिजिटल पद्धतीने ही विमा काढणे सोपे झाले असल्याचे सांगितले जात आहे.