Yamaha भारतात लॉन्च करणार नवी मोटरसायकल, 1 लाख किंमत असण्याची शक्यता
Yamaha (Photo Credits-Twitter)

Upcoming Motorcycle of Yamaha: भारतात यामाहा मोटरसायकलचे काही निवडक ग्राहक आहेत. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या माहितीनुसार यामाहा कंपनीकडून एका नव्या मोटरसायकलवर काम करत आहे. जी Yamaha FZ-X असे संबोधले जाणार आहे. कंपनीकडून लॉन्च केली जाणारी ही बाइक एक रेट्रो स्टाइलची असणार आहे. याचे डिझाइन FZ Fi आणि FZS Fi कडून प्रेरित केलेले आहे. सध्या ही मोटरसायकल नुकतीच अटल टनलच्या जवळ टेस्टिंग दरम्यान दिसून आली आहे.(Genesis ने उतरवली शानदार इलेक्ट्रिक कार G80, सिंगल चार्जमध्ये 500km अंतर कापणार)

आता पर्यंत ही बाइक एकूण तीन विविध रंगात ब्लू, ऑरेंज आणि ब्लॅकमध्ये टेस्टिंगवेळी दिसली आहे. त्यामुळे असा अंदाज लावला जाऊ शकतो क, नवी बाइक नेक्ड स्ट्रिटफायटरच्या तुलनेत डिझाइननुसार पूर्णपणे वेगळी असणार आहे. यामाहाचे डिझाइन एक रेट्रो स्टाइल सारखे दिसणार असून त्यामध्ये कंपनी पारंपरिक टियर ड्रॉप आकाराचे इंधन टँक, गोलाकार हेडलॅम्प, बुमरँगच्या आकाराचे रेडिटएटर गार्ड, फ्लॅट सीट, अपराइट हँडलबार आणि सेंसर सेट फुटपेग असणार आहे.

रिपोर्ट्सनुसार, कंपनी या बाइकमध्ये एक एग्जॉस्ट आणि एक डिजिटल इंस्ट्रुमेंट कंसोलचा प्रयोग करणार आहे. इंजिनच्या ऑप्शन बद्दल बोलायचे झाल्यास यामाहा रेट्रो स्टाइल मोटरसायकलमध्ये एक नवे 149cc एअर कुल्ड इंजिनचा वापर केला जाऊ शकतो. जो 12.4bhp ची पॉवर आणि 13.3Nm चा टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. हे इंजिन 5 स्पीड कॉन्सटेंट मॅश ट्रान्समिशन पेक्षा लैस असणार आहे.(Audi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स)

यामाहाची ही नवी बाइक 150cc सेगमेंट मध्ये FZ, R15 आणि R15 चा समावेश असणार आहे. याची किंमत जवळजवळ 1 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. कंपनीची नवी मोटरसायकलच्या लीक झालेल्या माहितीनुसार, यामध्ये 1330 मिमीचे व्हिलबेस दिले जाणार आहे.