Cars | Image used for representational purpose (Photo Credits: PTI)

सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफक्चर्स (SIAM) ने सप्टेंबर महिन्यात वाहनांच्या सेल्स बद्दल त्यांचा एक रिपोर्ट जाहीर केला होता. या रिपोटनुसार पॅसेंजर वाहनाच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. लोकांना असे वाटते की, आपल्या संपूर्ण परिवारासोबत वाहनातून प्रवास करावा. त्यामुळे तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचा विचार करत असून MPV खरेदी करणार असल्यास या काही महत्वाच्या गोष्टी जरुर लक्षात ठेवा. कारण या गोष्टी तुमच्यासह परिवाराच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत गरजेच्या आहेत.(Motor Insurance: वाहनाच्या Insurance साठी आता PUC असणे अत्यावश्यक, IRDA यांनी जाहीर केले आदेश)

बहुतांश कारमध्ये ड्रायव्हर आणि पॅसेंजर एअरबॅग दिल्या जातात. परंतु तुम्ही ज्यावेळी फॅमिलीसाठी एखादी कार खरेदी करणार असल्यास त्यामध्ये पॅसेंजर एअरबॅग्स दिल्या आहेत की नाही हे माहित करुन घ्या. खरंतर अपघात झाल्यास पॅसेंजरला धोका उद्भवतो. अशातच पॅसेंजर साइड एअरबॅग्स महत्वाची भुमिका घेतात.

काही कारमध्ये हेड रुम आणि लेग रुम अत्यंत कमी दिला जातो. त्यामुळे जर तुम्ही खराब रस्त्यांवरुन जात असल्यास खड्डा मध्ये आल्यास तुम्ही कारच्या रुफला धडकू शकता. यामुळे तुम्हाला दुखापत होण्याची सुद्धा शक्यता आहे.(Car Safety Features: ABS ते TPMS पर्यंत 'या' 4 उत्तम सेफ्टी फिचर्स शिवाय नवी कार खरेदी करु नका)

 ABS आणि EBD प्रत्येक गाडीच्या सेफ्टीसाठी गरजेचे आहे. ABS (अॅन्टी लॉक ब्रेकिंग सिस्टम) आणि EBD (इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रिब्युशन) तुमच्या कारला रस्त्यांवर स्टेबल ठेवण्यास मदत करतात. खरंतर फॅमिलीसाठी घेतलेल्या कारमध्ये अचानक ब्रेक मारल्यास कारचा तोल बिघडू शकतो. तर अशा स्थितीत ABS आणि EBD असणे अत्यंत महत्वाचे आहे. तसेच एमपीवी कार खरेदी करताना चाईल्ड सेफ्टीसाठी काय सुविधा दिली आहे ते तपासून पहा. चाइल्ड सेफ्टीच्या रेटिंगमध्ये तुमच्या कारला उत्तम रेटिंग असल्यास ती तुमच्या मुलासाठी फायदेशीर ठरु शकते.