देशभरात 1 सप्टेंबर पासून नवे वाहतुकीचे नियम (Traffic Rules) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या विविध नियमाअंतर्गत चलान आणि दंडाच्या रक्कमेत भरघोस वाढ करण्यात आली आहे. नव्या नियमानुसार हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास 500 रुपये नव्हे तर 1500 रुपयांचा दंड स्विकारला जाणार आहे. तसेच वाहनपरवाना शिवाय गाडी चालवताना पकडले गेल्यास 5000 रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
त्यामुळे जर तुम्हाला वाहतुकीच्या संबंधित पोलिसांकडून फाडण्यात येणाऱ्या हजारो रुपयांच्या चलान पासून वाचण्यासाठी 'या' मार्गाचा वापर करा. त्यामुळे तुमचे हजारो रुपये वाचणार आहेत. तर सध्या दिल्लीसह अन्य ठिकाणी वाहतुकीच्या नव्या नियमानुसार चालकांकडून हजारो रुपयांचे चलानची रक्कम वसूल करण्यात आली आहे.
-डिजिलॉकर (Digilocker) नावाचे प्रथम अॅप तुमच्या स्मार्टफोनमध्ये डाउनलोड करा.
-या अॅपच्या मदतीने तुम्हाला वाहनाचे सर्व महत्वाची कागदपत्रे स्कॅन करुन स्टोर करता येणार आहे.
-त्यामुळे प्रत्येक वेळी ओरिजनल कागदपत्र घेऊन फिरण्याचा त्रास वाचणार आहे.
डिजिलॉकर या अॅप तुम्हाला तुमच्या सोईनुसार त्याच्या वापर करता येणार आहे. तसेच या अॅपच्या माध्यमातून तुमची ई-स्वाक्षरी सुद्धा करता येणार आहे. युआयइडीआय, रोड ट्रान्सपोर्ट, हायवे मिनिस्ट्री, इनकम टॅक्स डिपार्टमेंटसह अन्य सेवांसाठी डिजिलॉकर अॅप काम करते.(खबरदार! वाहतुकीचे नियम मोडाल तर, होईल 25,000 रुपये दंड, 3 वर्षे तुरुंगवास; जाणून घ्या New Traffic Rules in India 2019)
गेल्या काही वर्षात रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण प्रचंड वाढले होते. हा आकडा प्रतिवर्ष तब्बल दीड लाखाच्या घरात असल्याचे अधिकृतपणे सांगितले जाते. केंद्रिय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा याबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक विभागानेच जुन्या मोटारवाहन कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक 16 व्या लोकसभेत मांडले होते.