Toyota ने भारतात लॉन्च केली 14 सीटर MPV Hiace, जाणून घ्या किंमतीसह खासियत
Toyota MPV Hiace (Photo Credits-Facebook)

दिग्गज वाहन निर्माती कंपनी टोयोटा (Toyota) किर्लोस्कर यांनी भारतात आपली 5व्या जनरेशनची 14 सीटर एमपीवी Hiace लॉन्च केली आहे. कंपनीकडून ग्लोबली Hiace च्या 6व्या जनरेशनच्या मॉडेलची विक्री केली जात आहे. ही एमपीवी CBU सह भारतात लॉन्च केली आहे. या व्यतिरिक्त ग्राहकांना ही 14 सीटर कार दोन कलर ऑप्शनमध्ये खरेदी करता येणार आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारतात याच्या काही युनिट्सची विक्री करण्यास उपलब्ध आहे. भारतात याची किंमत  55 लाख रुपये एक्स शो रुम किंमत ठरवण्यात आली आहे.

कंपनीच्या या MPV मध्ये 14 वृद्ध प्रवाशांच्या बसण्याची व्यवस्था आणि सर्व सीट्सवर Ac वेंट्स पहायला मिळणार आहे. याची अखेरची सीट फोल्ड करुन अतिरिक्त सामान ठेवण्याची सुद्धा जागा दिली गेली आहे. टोयोटा Hiace एक फिचर पॅक, आधुनिक वॅन व्यतिरिक्त एस पॅसेंजर वाहन आहे. याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाल्यास Hiace मध्ये Aux आणि USB कनेक्टिव्हिटीसह 2-DIN ऑडिओ सिस्टिम, पॉवर स्टिअरिंग, पॉवर स्लाइडिंग रियर दरवाजे, फॅब्रिक सीट, पॉवर विंडो, रियर डिफॉगर आणि हॅलोजन हेडलॅम्प सारथ्या सुविधांपेक्षा लैस  तयार करण्यात आली आहे.(3 लाखांहून स्वस्त कारवर दिला जातोय बंपर डिस्काउंट, 39 हजार रुपयांपर्यंत होऊ शकते बचत)

प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी टोयोटा Hiace मध्ये फ्रंटला दोन एअरबॅग्स, एबीएस आणि ईबीडी सारखे फिचर्स मिळणार आहेत. या एमपीवीच्या इंटीरियर बद्दल बोलायचे झाल्यास कारमध्ये कोणत्याही प्रकारचा हायटेक टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला नाही. याच्या आतमधील इंटीरियर अत्यंत साधे असणार आहे. दरम्यान, Hiace च्या पॅसेंजर सीटसाठी मात्र उत्तम फॅब्रिक वापरण्यात आले आहे. फ्रंटला ड्रायव्हरसीटसाठी रिक्लाइनचा ऑप्शन मिळणार आहे. बाहेरच्या बाजूस कारचे बॉक्सी डिझाइन आहे.

कारच्या पॉवर बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये एक 2.8 लीटर 4 सिलिंडर टर्बो डिझेल मोटर दिले जाणार आहे. जो कंपनीच्या फुल साइज एसयुवी Fortuner मध्ये सुद्धा दिसून येणार आहे. पण फॉर्च्युनर मध्ये 204bhp आणि 420Nm चा कमीतकमी टार्क एमटी वेरियंट मिळणार आहे. याच्या ऑटोमॅटिक वेरियंट 500Nm चा पीक टार्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. तर Hiace 151hp आणि 300Nm चा पीक टॉर्क जनरेट करु शकते. त्याचसोबत एमपीवी मध्ये 6 स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सुद्धा दिले आहेत.