
फेब्रुवारी महिन्यात जर तुम्ही एखादी नवी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही खुशखबर आहे. त्याचसोबत तुमचे बजेट तीन लाखांपेक्षा कमी असल्यास अशा कारबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ज्यावर 39 हजारांपर्यंत बचत होणार आहे.या कारमध्ये Datsun Redi-Go आणि Maruti Suzuki Alto यांचा समावेश आहे. तर याच संदर्भात आम्ही तुम्हाला अधिक माहिती देणार आहोत.(2021 Tata Safari SUV भारतात 22 फेब्रुवारी ला होणार लॉन्च; 30,000 पासून बुकिंग सुरु)
या महिन्यात तुम्ही Datsun च्या Redi-Go कार खरेदी करण्याचा विचार करत असल्यास यावर तुम्हाला एकूण 34 हजारांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीकडून यावर 15 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त जुनी कार देऊन नवी कार रेडी गो खरेदी केल्यास ग्राहकांना 15 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस ही दिला जाणार आहे, तर कॉर्पोरेट कर्मचारी या कारवर 4 हजारापर्यंत सूट मिळवू शकतात. या कारची सुरुवाती दिल्लीतील एक्स शो रुम किमत 2.86 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप अॅन्ड वेरियंटची किंमत 4.82 लाख रुपयांपर्यंत आहे.(Elon Musk ला मोठा झटका; Tesla च्या गाड्यांमध्ये आढळल्या त्रुटी, 1,58,000 गाड्या परत मागवण्याचे आदेश)
Maruti Suzuki Alto तुम्हाला खरेदी करायची असल्यास तुमच्याकडे सुवर्ण संधी आहे. कारण यावर एकूण 39 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळणार आहे. कंपनीकडून यावर 20 हजार रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15 हजार पर्यंत एक्सजेंच बोनस दिला जाणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी यावर 4 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट बोनस सुद्धा देत आहे. याच्या किंमती बद्दल बोलायचे झाल्यास 2.99 लाख रुपये आहे.