कोणत्या लोकांनी Royal Enfield खरेदी करु नये? होईल नुकसान
Royal Enfield (Photo Credits-Twitter)

रॉयल इनफिल्ड्स (Royal Enfield) बाइक्स भारतात प्रसिद्ध आणि बहुतेक जण खरेदी करण्याची इच्छा करतात. भारतात या बाइक्सची जबरदस्त डिमांड असून त्याची क्लासी डिझाइन आणि उत्तम पॉवर यामुळे सर्वांच्या ती पसंतीस पडते. पण काही लोकांना बाइक्सच्या लूकमुळे ती आवडत नाही. खरंतर रॉयल इनफिल्ड सामान्य बाइक्सपेक्षा वेगळी आहे. कारण त्यासाठी देण्यात आलेले फिचर्स आणि त्याची खासियत हटके आहे. पण बहुधा सामान्य बाईक्समध्ये अशा काही गोष्टी असतात त्या लोकांना आकर्षित करतात. त्यामुळेच ते लोक ती बाइक खरेची करण्याकडे वळतात. जर तुम्ही फक्त डिझाइन आणि पॉवरफुल इंजिन पाहून रॉयल इनफिल्ड खरेदी करण्याचा विचार करत असाल तत्पूर्वी याबद्दल अधिक जाणून घ्या.

रॉयल इनफिल्ड ही सामान्य बाइक्सच्या तुलनेत वजनाने जड असते. त्यामुळे ती सांभाळण्यासाठी थोडी प्रॅक्टिस असणे गरजेचे आहे. रेग्युलर बाइक्स या वजनाने हलक्या असतात. त्या चालवणे सुद्धा काहीसे सोप्पे असते. पण रेग्युलर बाइक्स चालवणाऱ्यांना रॉयल इनफिल्ड चालवण्यास काही समस्या येऊ शकतात.(Honda H'ness CB350 : होंडा कंपनीने लॉन्च केली रेट्रो बाईक; Royal Enfield Classic 350 ला टक्कर देणारी ठरणार)

अधिक मायलेजची अपेक्षा ठेवणाऱ्यांना हे नक्की माहिती हवे की, रॉयल इनफिल्ड बाइक्स मायलेजच्या तुलनेत कमी आहे. खरंतर पॉवरफुल इंजिन असल्याने या बाइकचे मायलेज कमी होते आणि इंजिन फ्यूअलचा वापर करते. त्याचसोबत रॉयल इनफिल्डचा पिकअप अधिक असतो असे नाही. मात्र या बाइक्सचे पिकअप थोडा कमी असतो. त्यामुळे तुमच्यात निराशा उद्भवू शकते. ऐवढेच नाही तर रॉयल इनफिल्ड्स बाइक्सचे पार्ट्स आणि त्याची ठेवणूक ही थोडी महाग असते. पार्ट्स रेग्युलर बाइक्सच्या तुलनेत अधिक महाग असतात. काही वेळेस इनफिल्डचे काही पार्ट्स मिळत सुद्धा नाही. याच कारणास्तव तुमचे बजेट थोडे वाढू शकते.