Tesla च्या इलेक्ट्रिक कारला हिंदी भाषा सुद्धा करणार सपोर्ट, समोर आली 'ही' महत्वाची माहिती
Tesla (Photo Credits-Twitter)

जगातील सर्वाधिक मोठी इलेक्ट्रिक वाहन निर्माती कंपनी टेस्ला (Tesla) लवकरच भारतात आपली पहिली ईवी कार अधिकृतरित्या लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. टेल्सा कारमध्ये इंन्फोटेन्मेंट सिस्टिम असून त्यामध्ये हिंदा भाषात कमांड देताना दिसून आले आहे. टेस्लाच्या इंन्फोटेन्मेंट सिस्टिमचा स्क्रिनशॉट सोशल मीडियात पोस्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये हिंदीत कमांड लिहिल्याचे दिसले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यामुळे टेस्ला कार भारतीय नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.(सिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत)

टेस्लाकडून भारतीय मंत्रालयाला पत्र लिहून इलेक्ट्रिक वाहनांवरील आयात कर कमी करण्याची मागणी केली आहे. जर भारत सरकारने कंपनीची ही गोष्ट मान्य केल्यास कारच्या किंमती कमी होऊ शकतात. त्यामुळे भारतीय नागरिकांच्या शिखाला परवडणाऱ्या किंमतीत ती उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. गेल्या काही वर्षांपासून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. यापूर्वी सुद्धा इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांनी कारवरील आयात कर कमी करण्यासंदर्भात मागणी केली होती. मात्र देशात असलेल्या प्रतिस्पर्ध्यांच्या विरोधकामुळे कंपन्यांना आयात कर द्यावाच लागत आहे.(Vintage Motor Registration : व्हिंटेज कारचा वारसा जपण्यासाठी वाहनांची नोंदणी सुरू, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती)

नुकत्याच एका भारतीयाने ट्विटरवर एलन मस्क यांना विचारले की, भारतात लवकरच आपल्या कारची विक्री करण्यास सुरु करावी.त्यावर मस्क यांनी उत्तर दिले की, त्यांच्या कंपनीला असे करायचे आहे पण भारतात जो आयात कर लावला जातो तो सर्वाधिक आहे. येथे डिझेल आणि पेट्रोल कार प्रमाणे पर्यावरणासाठी अनुकूल कारवर सुद्धा शल्क लावला जातो. त्यांनी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे की, भारतात कमीत कमी इलेक्ट्रिक कारवरील अस्थायी आधारावर शुल्क कमी केले जाणार आहे. टेस्ला भारतात सर्वात प्रथम आपली इलेक्ट्रिक कार मॉडेल 3 लॉन्च करणार आहे. ही काहीवेळा भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग दरम्यान दिसून आली होती.