सिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत
Bicycle | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

GoZero Mobility Electric Cycle: पेट्रोलच्या सातत्याने वाढत्या किंमतीमुळे भारतात आता कमी खर्चिक अशा वाहनांच्या शोधात नागरिक आहेत. यामुळे आता बहुतांश लोक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करण्याकडे वळत आहेत. कारण यासाठी अत्यंत कमी खर्च येत असून ती वजनाने सुद्धा हलकी असते. याच पार्श्वभुमीवर आम्ही तुम्हाला अशा एका इलेक्ट्रिक सायकल बद्दल सांगणार आहोत जी 25 किमी पर्यंतची रेंज देण्यास सक्षम आहे.(Ford कडून भारतात Figo ऑटोमॅटिक लॉन्च, जाणून घ्या फिचर्ससह खासियत)

GoZero Mobility ने आपली इलेक्ट्रिक सायकल स्केलिंग लाइट लॉन्च केली आहे. तर ही इलेक्ट्रिक सायकल भारतात 19,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे. तसेच पेट्रोलचे दर वाढत असल्याने तुम्ही बजेट फ्रेंडली एखादे वाहन खरेदी करायचे असल्यास तर ही इलेक्ट्रिक सायकल तुमच्या कामी येईल. कंपनीची ही इलेक्ट्रिक सायकल ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातून खरेदी करता येणार आहे. बुकिंगसाठी तुम्हाला 2999 रुपये द्यावे लागणार आहेत.(Ola Electric scooter : ओला इलेक्ट्रिकने आपल्या नवीन दर्जेदार ई-स्कूटरचे सुरू केले बुकिंग, जाणून घ्या कसे कराल प्री-बुकिंग)

सायकलच्या स्पीड बद्दल बोलायचे झाल्यास ती 25 किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देण्यास सक्षम आहे. खासियत अशी की याला पॅडेल असल्याने तुम्ही त्याचे चार्जिंग संपल्यानंतर सुद्धा चालवू शकता.गोझिरो मोबिलिटी स्केलिंग लाइट इलेक्ट्रिक सायकल पॅक फक्त 2.5 तासात फुल चार्ज करता येणार आहे. ती GoZero Drive Control 2.0 LED डिस्प्ले युनिटद्वारे नियंत्रित करता येणार आहे. त्यामुळे चालकाला तीन पेडल असिस्ट मोड दरम्यान कोणत्याही एकाचा वापर करता येणार आहे.