Tata Motors कंपनी नागरिकांना भाड्याने देणार 15 लाखांची कार, 36 महिने चालवून झाल्यानंतर पुन्हा परत द्यावी लागणार
Tata Motors | (Photo Credits: Tatamotors.com)

टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनीने त्यांच्या ग्राहकांसाठी एक भन्नाट ऑफर आणली आहे. त्यानुसार आता कंपनी ग्राहकांना त्यांची 15 लाख रुपये किंमत असलेली कार भाड्याने चालण्यास देणार आहेत. खरंतर Tata Motors यांनी त्यांची इलेक्ट्रिक कार Nexon EC साठी हे सब्सक्रिप्शन सुरु केले आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, ही स्किम काही काळासाठी शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी खुप फायदेशीर ठरणार आहे. त्याचोसबत त्यांना गाडी खरेदी करण्याची चिंता सुद्धा करावी लागणारनाही आहे.(Tata Motors यांची धमाकेदार ऑफर, Down Payment शिवाय गाडी खरेदी करता येणार)

कंपनीने सध्या 18 महिने, 24 महिने आणि 36 महिन्यांसाठी गाडीचे सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च केले आहे. जर ग्राहकाला 18 महिन्यांसाठी टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिक कार भाड्याने घ्यायची असल्यास त्याला प्रत्येक महिन्याला 47,900 रुपये मात्र मोजावे लागणार आहेत. 24 महिन्यांच्या सब्सक्रिप्शन प्लॅनमध्ये 44,900 रुपये तर 36 महिन्यांच्या प्लॅनसाठी 41,900 रुपये भाडे द्यावे लागणार आहे. त्याचसोबत सब्सक्रिप्शन संपल्यानंतर ग्राहकांना या संदर्भातील प्लॅन वाढवू सुद्धा शकतात किंवा गाडी पुन्हा कंपनीला परत करु शकतात.

कंपनीचे असे सुद्धा म्हणणे आहे की, सब्सक्रिप्शन स्किम अंतर्गत इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याची नागरिकांची इच्छा होईल. यासाठी टाटाने ओरिक्स ऑटो इंफ्रास्ट्रक्चर सर्विसेस लिमिडेटसह हातमिळवणी केली आहे. प्रत्येक महिन्याला भाड्याव्यतिरिक्त ग्राहकांना अन्य शुक्ल द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे ग्राहकांनी कार चार्ज करुन चालवावी. टाटा कंपनीची ही कार एकदा फुल चार्ज झाल्यानंतर 312 किमी पर्यंत धावणार आहे. यामध्ये 30.2 kWh ची लिथिअम Iron बॅटरी देण्यात आली आहे. याची बॅटरी 8 तासांपर्यंत फुल चार्ज होते. तर फास्ट चार्जरच्या माध्यमातून 60 मिनिटात 80 टक्के बॅटरी चार्ज होते.(Ertiga ला टक्कर देण्यासाठी टाटा कंपनी घेऊन येणार MPV कार, जाणून घ्या अधिक)

स्पीडबाबत बोलायचे झाल्यास ही EV फक्त 9.9 सेकंदात 0-100km स्पीड पकडू शकते. Tata Nexon EV ची दिल्लीतील एक्स शोरुम किंमत 13.99 लाख रुपये असून ऑन प्राइज किंमत जवजवळ 15,63,997 रुपये आहे. तर टॉप वेरियंटची एक्स-शोरुम किंमत 15.99 लाख रुपये आहे. टाटा मोटर्सचे हे खास सब्सक्रिप्शन सध्या देशातील 5 मोठ्या शहरात उपलब्ध आहे. त्यामध्ये दिल्ली/एनसीआर, मुंबई, पुणे, हैदराबाद आणि बेंगळुरु यांचा समावेश आहे.