Ertiga ला टक्कर देण्यासाठी टाटा कंपनी घेऊन येणार MPV कार, जाणून घ्या अधिक
Maruti Ertiga (Photo Credits: Suzuki.com

गेल्या काही वर्षात टाटा मोटर्स यांनी गाड्यांचे काही नवे मॉडेल्स भारतात लॉन्च केले आहेत, गेल्या वर्षात कंपनीने टाटा हॅरियर (Tata Harrier) भारतीय बाजारात उतरवली होती. कंपनीची प्रीमिययम हॅचबॅक टाटा अल्ट्रॉज (Tata Altroz) सुद्धा या वर्षात ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचसोबत कंपनीने BS6 इंजिनसह मॉडेल्स अपग्रेड केले आहेत. काही मॉडेल्स फेसलिफ्ट वर्जनवर आधारित आहेत. आता कंपनी MPV सेगमेंटमधील नवे मॉडेल आणण्याची तयारी करत आहे.टाटाची ही एमवीपी मारुती अर्टिगा आणि महिंद्रा मराजो यांना टक्कर देणारी असणार आहे.  कंपनीकडून कारबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु टाटा या कारसाठी 1.5 लीटर टर्बोचार्ज्ड इंजिन देण्याची शक्यता आहे. (Hero Xtreme 160R भारतात लॉन्च, 4.7 सेंकदात पकडणार 0-60 kmph चा वेग)

मारुतीची अर्टिगाला MPV सेगमेंटमध्ये प्रचंड प्रतिसाद ग्राहकांकडून देण्यात आलेला आहे. ही कार मारुती कंपनीने गेल्या वर्षात BS6 इंजिनसह झळकवली होती. BS6 Maruti Ertiga ची किंमत 7.54 लाख ते 10.05 लाख रुपयांपर्यंत आहे. याची फक्त पेट्रोल इंजिन असेलल्या कारसाखी ग्राहकांना 7.44 लाख ते 9.95 लाख रुपयांदरम्यान आहे. मारुती अर्टिगा मध्ये ड्युअल फ्रेंट एअरबॅग्स, हाय स्पीड वॉर्निग अलर्ट, ISOFIX चाईल्ड सीट एंकरेज, ईबीडीसह एबीएस, ब्रेक असिस्ट आणि रिव्हर्स पार्किंग सेंसर्स सारखे सेफ्टी फिचर्स स्टँटर्ड म्हणजेच सर्व वेरियंटमध्ये देण्यात आले आहेत. (Volkswagen Nivus Coupe SUV लॉन्च, जाणून घ्या फिचर्स आणि खासियत)

टाटा मोटर्सची येणारी प्रीमियम हॅचबॅक अल्ट्रॉजवर आधारित इलेक्ट्रिक कार या वर्षात झालेल्या जिनेव्हा मोटर शो मध्ये झळकवण्यात आली होती. ही 250-300 किमी रेंजसह येणार आहे. फास्ट चार्जिंगसह ही 1 तासात 80 टक्के चार्ज होणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत ती लॉन्च करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याची किंमत 10 रुपयापर्यंत असण्याची शक्यता आहे.