लॉकडाऊनच्या काळात बहुतांश कार निर्मात्या कंपन्यांच्या गाड्या विक्रीस न गेल्याने ते आता ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध मार्ग सुचवत आहेत. याच दरम्यान आता देशातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्स (Tata Motors) यांनी ग्राहकांसाठी एक नवी धमाकेदार ऑफर आणली आहे. याच्या अंतर्गत ग्राहकांना डाऊन पेमेंट (Down Payments) शिवाय टाटा कंपनीची नवी कार खरेदी करता येणार आहे. टाटा मोटर्स यांनी ही ऑफर करुर वैश्य बँकेच्या पार्टनरशिप सोबत लॉन्च केली आहे.
टाटा कंपनीच्या या ऑफर अंतर्गत टियागो, नेक्सॉन आणि अल्ट्रॉज कार डाऊन पेमेंट शिवाय खरेदी करता येणार आहे. कार खरेदी केल्यानंतर 6 महिन्यापर्यंत कंपनी EMI ग्राहकांकडून घेणार नाही आहे. तसेच 100 टक्के ऑन-रोड फंडिंग सुविधा सुद्धा देत आहे. त्यानुसार ती 5 वर्षांसाठी मिळणार आहे.(Ertiga ला टक्कर देण्यासाठी टाटा कंपनी घेऊन येणार MPV कार, जाणून घ्या अधिक)
नवी फायनान्स स्किम्स व्यतिरिक्त टाटा मोटर्स 8 वर्षापर्यंत अशा लॉन्ग टर्मसाठी लोनवर सोप्पी सेट-अप- ईएमआय ऑफर करत आहे. तसेच कमी ईएमआयची सुविधा कंपनीकडून ग्राहकांना देण्यात येणार आहे. त्यानुसार टाटा टियागोवर प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला EMI हा 4,999 रुपये असणार आहे. तसेच अल्ट्रॉजसाठी 5,555 रुपयांचा ईएमआय आणि नेक्सॉनवर 7,499 रुपयाचा EMI देऊन खरेदी करता येणार आहे.
काही दिवसांपूर्वी कंपनीने त्यांच्या Altroz हॅचबॅक कारवर ग्राहकांना शानदार ऑफर देत आहे. कंपनीने नव्या EMI स्किम अंतर्गत ग्राहकांना ही कार फक्त 5,555 रुपये मासिक हप्त्यावर रुपये घरी आणता येणार आहे. ही प्रिमियम हॅचबॅक कार वर्षाच्या सुरुवातीला लॉन्च करण्यात आली होती. टाटा कंपनीची ही कार मारुति Baleno, ह्युंदाई Elite i20, होंडा Jazz सारख्या कारला टक्कर देण्यासाठी उतवरण्यात आली. कारला ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये 5 स्टार देण्यात आले आहेत.