
देशातील दिग्गज वाहन निर्माती कंपनी Tata Motors ने अधिकृतरित्या 2025 पर्यंत भारतीय बाजारात 10 नव्या ईलेक्ट्रिक कार लॉन्चिंग करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने सध्या Tigor आणि Nexon च्या इलेक्ट्रिक डेरिव्हिटिव्हची विक्री करत आहेत. आपल्या बाजाराची स्थिती अधिक उत्तम बनवण्यासाठी टाटा मोटर्स आता पुढील 1 वर्षात दोन नव्या इलेक्ट्रिक वाहन लॉन्च करण्याची तयारी करत आहे.(भारतात लॉन्च झालेल्या यामाहा कंपनीच्या नव्या FZX च्या किंमतीसह फिचर्सबद्दल अधिक जाणून घ्या)
कंपनी टाटा अल्ट्रोज ईवी आणि एक नवी कॉम्पॅक्ट इलेक्ट्रिक मिनी एसयुवी लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मिनी एसयवी कंपनीची अपकमिंग लहान एसयुवी एचबीएक्सच्या कॉन्सेप्टवर आधारित असणार आहे. याचे इंजिन असणारे मॉडेल 2020 ऑटो एक्सपो मध्ये झळकवले होते. तर अल्ट्रोज ईवी पुढील वर्षाच्या सुरुवातीला येणार आहे. एचबीएक्सवर आधारित ईवी 2022 च्या सहा महिन्यांत लॉन्च केली जाऊ शकते. याची किंमत 10 लाख रुपयांपेक्षा असण्याची शक्यता आहे.
अल्ट्रोज ईवी मध्ये इलेक्ट्रिक पॉवरट्रेन दिसण्याची शक्यता आहे. जी नेक्सॉन ईवीमध्ये दिले जाते. नेक्सॉन ईवी मध्ये स्थायी चुंबक AC मोटरसह IP67 रेटिंग प्रमाणित 30.2kwh ची बॅटरी पॅक आहे. अल्ट्रोज ईवीच्या 250 किमी ते 300 किमी दरम्यान ड्रायव्हिंग रेंज देण्याची शक्यता आहे. फास्ट चार्जिंगच्या बॅटरीला 80 टक्के चार्ज होण्यासाठी 1 तासांचा वेळ लागते. नियमित पॉवर सॉकेटच्या माध्यमातून पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागण्याची संभावना आहे.(Tesla च्या सर्वाधिक स्वस्त कारची भारतीय रस्त्यांवर टेस्टिंग सुरु, ड्रायव्हिंग रेंजसह किंमतीबद्दलचा वाचा रिपोर्ट)
टाटा एचबीएक्स ईवी स्वदेशी बाजारात ब्रँन्ड मधील सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रिक कार असण्याची शक्यता आहे. मायक्रो एसयुवी जिपट्रॉन ईवी पॉवरट्रेन तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. जो नेक्सॉन ईवीची पॉवर देणार आहे. पॉवरट्रेनमध्ये 30.2kWh लिथियम-आर्यन बॅटरी पॅकचा समावेश आहे. जी 129bhp ची पॉवर देणार आहे, इलेक्ट्रिक मोटर फ्रंट एक्सवर लावली जाते.
नेक्सॉन ईवी एकदा चार्ज केल्यानंतर 312km रेंज देणार आहे.