Tata Motors ने लॉंच केली भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार; एकदा चार्ज केल्यावर 213 KM मायलेज; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Tata Tigor EV (Photo Credit : Youtube)

देशाला आर्थिक मंदीच्या झळा बसत आहे, याचा सर्वात जास्त फटका बसला तो वाहन क्षेत्राला. दिग्गज वाहन निर्माता कंपनी टाटा मोटर्सच्या (Tata Motors) नॅनोची (Tata Nano) विक्री सर्वात जास्त रखडली आहे. गेल्या 9 महिन्यात फक्त एक नॅनो विकली गेली आहे. आता टाटा मोटर्सने आपली कॉम्पॅक्ट सेडान कार टिगोर ईव्ही (Tata Tigor EV) लाँच केली आहे. कंपनीने पूर्वीपेक्षा यामध्ये बरीच सुधारणा केली आहे. टाटाची ही सर्वात स्वस्त कार असल्याचे सांगितले जात आहे. चला जाणून घेऊया त्याची किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल

एआरएआयच्या प्रमाणपत्रानुसार, ही कार एकदा फुल चार्ज केल्यावर तब्बल प्रति किमी 213 किमीचे मायलेज देईल. टाटा मोटर्सने एक्स ई प्लस, एक्स एम प्लस आणि एक्स टी प्लस अशा तीन प्रकारांत ही गाडी सादर केली आहे. टाटा टिगोर ईव्हीची सर्वात मोठी खासियत म्हणजे ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. टाटा मोटर्सने या कारची सुरुवातीची किंमत 9.44 लाख रुपये ठेवली आहे. व्यावसायिक खरेदीदारांसाठी ही कार अतिशय फायदेशीर ठरू शकते. खासगी खरेदीदारांसाठी टाटा टिगोर ईव्हीची किंमत 13.9 लाख रुपये आणि 12.59 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

टाटा टिगोर ईव्ही ड्राईव्ह आणि स्पोर्ट या दोन ड्रायव्हिंग मोडमध्ये उपलब्ध असेल. या गाडीमध्ये शॉर्क फिन अॅन्टीना, ईव्ही डेकल्स, अलॉय हील्स, हर्मन ट्युन्ड साऊंड सिस्टम, उंचीनुसार वर खाली होणारी ड्रायव्हर सीट इत्यादींचा समावेश आहे. या गाडीमध्ये दोन चार्जिंग पोर्ट्स असतील, त्यातील एक नियमित चार्जिंग व दुसरे वेगवान चार्जिंग पोर्ट असेल.

या गाडीमध्ये सेफ्टीसाठी ड्युअल एअरबॅग, एक्सएम प्लस, एक्सटी प्लस ट्रिम एबीएससह सुसज्ज आहेत. बेस एक्सई प्लस ट्रिममध्ये फक्त ड्रायव्हर साइड एअरबॅग आहेत. ही इलेक्ट्रिक सेडान पांढऱ्या, सिल्व्हर आणि निळ्या रंगात उपलब्ध आहे. या गाडीसोबत तीन वर्षांची वॉरंटी दिली जात आहे, जी 1.25 लाख किलोमीटरसाठी वैध असेल. (हेही वाचा: भारतातील 'या' दिग्गज कार निर्माता कंपनीला लागले ग्रहण; गेल्या 9 महिन्यात फक्त 1 कार विकली गेली)

टाटा मोटर्सचा दावा आहे की, ही नवी टिगोर 12 सेकंदात 0 ते 60 किमी प्रतितास वेग पकडू शकते. याचा टॉप  स्पीड 80 किमी प्रतितास आहे. कारचे एकूण वजन 1516 किलो आहे. DC15 kW फस्त चार्जरने ही गाडी 90 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते, तर स्टँडर्ड एसी वॉल सॉकेटने ती सहा तासात 80 टक्के चार्ज होते.