Upcoming Electric Cars of Tata Motors: देशातील दिग्गज वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्स भारतात त्यांच्या इलेक्ट्रॉनिक वाहनांचा विस्तार करु पाहत आहे. रिपोर्टच्या मते कंपनीच्या लाइनअप मध्ये प्रीमियम हॅचबॅक इलेक्ट्रिक अल्ट्रोज आणि मिनी एसयूवी HBX प्रमुख असणार आहे. या व्यतिरिक्त कंपनी Tata Nexon EV ची टॉप वेरियंट सुद्धा लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. पण याच्या लॉन्चिंगच्या तारखेबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.(Tata Motors कंपनी नागरिकांना भाड्याने देणार 15 लाखांची कार, 36 महिने चालवून झाल्यानंतर पुन्हा परत द्यावी लागणार)
Altroz EV ची इलेक्ट्रिक रेंज जवळजवळ 250 किमी ते 300 किमी असण्याची शक्यता आहे. तर ही कार स्टँडर्ड आणि डीसी फास्ट चार्जिंग दोन्ही सपोर्ट करणार आहे. या कारमध्ये नेक्सॉन ईवी प्रमाणे 35 कनेक्टेड कार फिचर्स दिले जाणार आहेत. याच सोबत टाटाची नवी ZConnect अॅप मिळण्याची शक्यता आहे. तर Tata Altroz EV आपल्या मानकांच्या मॉडेल पेक्षा थोडी वेगळी दिसणार आहे. याची किंमत 14 लाख रुपये होण्याची अपेक्षा आहे.(MPV खरेदी करण्यापूर्वी जरुर तपासून पहा 'हे' फिचर्स, तुमच्या परिवाराच्या सेफ्टीसाठी ठरेल अत्यंत जरुरी)
टाटा HBX EV नियमित मॉडेलच्या तुलनेत थोडी वेगळी असणार आहे. हे मॉडेल ब्रांडच्या Ziptron EV इंजिन लैस आहे. टाटा कंपनीची ही कार 300 किमी हून अधिक रेंज देण्यास सक्षम असणार आहे. तर Tata Nexon EV ची सुरुवाती किंमत भारतात 13.99 लाख रुपये ते 15.99 लाख रुपयांपर्यंत असणार आहे. वेरियंट्स बद्दल बोलायचे झाल्यास Nexon EV तीन वेरियंट्स XM, XZ+,XZ+ मध्ये उपलब्ध आहे. ज्यामध्ये कंपनी लवकरच नवे वेरियंट आणणार आहे.