KTM 390 adventure (Photo Credits-Twitter)

देशातील मोटरसायकल इंडस्ट्रीमध्ये गेल्या काही वर्षांपासून वेगाने सुरु आहे. मात्र आता सध्या राज्यात सुरु असलेल्या आर्थिक मंदीचा फटका मोटर इंडस्ट्रीला बसला असून बाईकच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. लेटेस्ट मॉडेलमधील जावा पेरक बाईक बाजारात आली आहे. येत्या काही महिन्यात काही नव्या बाईक्स लॉन्च केल्या जाणार आहेत. यामधील तीन शानदार बाईक लवकरच बाजारात विक्रीसाठी उतरवण्यात येणार आहेत. या तीन शानदार बाईकची गेल्या काही दिवसांपासून विक्रीसाठी प्रतिक्षा केली जात आहे.

शानदार बाईक मधील पहिली म्हणजे TVS Zeppelin 220, टीवीएसच्या क्रुजर बाईकच्या कॉनसेप्टला 2016 मध्ये ऑटो एक्सपो मध्ये दाखवण्यात आले होते. त्यानंतर पुढील वर्षात लॉन्च करण्यात आली होती. ही बाईक बजाज अवेंजर आणि रॉयल इनफिल्ड थंडरबर्ड 350 यांना टक्कर देणारी ठरणार आहे. मॉर्डन आणि स्पोर्टी लूक असलेल्या या बाईकमध्ये एलईडी हेडलॅम्प सुद्धा मिळणार आहे. या बाईकची किंमत 1.25 लाख ते 1.3 लाख दरम्यान आहे.(Yamaha कंपनीने सादर केली तीन चाकांची हटके स्कूटर; वाचा काय असतील वैशिष्ठ्ये)

केटीएमच्या मॉडेलमधील KTM 390 Adventure या बाईकची खुप वेळापासून सर्वांना प्रतीक्षा होती. पुढच्या वर्षाच्या सुरुवातीला ही बाईक लॉन्च करण्यात येणार आहे. या केटीएमचे इंजिन सुद्धा 390 ड्युकमध्ये देण्यात आले आहे. केटीएम 390 अॅडवेंचर दोन्ही बाजूंनी डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनल, 19 इंच फ्रंटसह अन्य फिचर्स देण्यात येणार आहेत. या अॅडवेंचरची किंमत 3 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. तर तीसरी दमदार बाईक म्हणजे Husqvarna Svartpilen 401 आणि Vitpilen 401 भारतात लवकरच लॉन्च होणार आहे. Svartpilen 401 मध्ये केटीएम 390 ड्युकचे 373.2C, सिंगल सिलिंडर इंजिन असणार आहे.