यामाहाची तीन चाकांची स्कूटर (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशातील प्रसिद्ध Yamaha कंपनी स्पोर्ट्स बाइकसाठी ओळखली जाते. मात्र आता कंपनीने बाजारात एक हटके बाईक आणली आहे. यावेळी कंपनीने काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने थ्री-व्हीलर स्कूटर (Three wheeler Scooter) सादर केली आहे. या स्कूटरला Tricity300 असे नाव देण्यात आले आहे. या गाडीच्या समोरील बाजूस दोन चाके आहेत. शहरी गतिशीलता लक्षात घेऊन कंपनीने हे खास डिझाइन तयार केले आहे. टोकियो मोटर शो 2019 मध्ये कंपनीने ही स्कूटर पहिल्यांदा सादर केली. ही स्कूटर 3 CT संकल्पनेवर आधारित आहे. अजूनतरी यामाहा कडून या स्कूटरची वैशिष्ट्ये किंवा किंमतीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.

पुढील महिन्यात इटलीच्या मिलान येथील EICMA मोटर शोमध्ये या गाडीची इतर माहिती मिळण्याची अपेक्षा आहे. सध्या मिळालेल्या माहितीनुसार ही स्कूटर तीन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. या गाडीचे वजन 239 किलो इतके असेल. पॉवरबद्दल बोलायचे झाले तर, ट्रासिटी 300 मध्ये 300 सीसी लिक्विड कूल्ड 4-स्ट्रोक इंजिन असेल. ही गाडी लांब पल्ल्यासाठीही व्यवस्थित चालेल.

स्कूटर इंजिन - 

> यात 292 सीसी इंजिन आहे

> यात लिक्विड कूल्ड, 4-स्ट्रोक, 4-व्हॉल्व्ह, सिंगल सिलिंडर, एसओएचसी टाइप इंजिन आहे

> या स्कूटरचे वजन 239 किलो आहे

> स्कूटरची इंधन टाकी क्षमता 13 लीटर आहे. (हेही वाचा: Maruti Suzuki ने लॉन्च केली सर्वात स्वत 7 सीटर कार, सेफ्टीसाठी मिळणार 'हे' खास फिचर्स)

ट्रायसिटी 300 स्कूटर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात (4 नोव्हेंबरपर्यंत) युरोपियन बाजारात दाखल होईल. भारतात त्याचे लॉन्चिंग होईल का नाही याबाबत सध्या कोणतीही अधिकृत माहिती नाही. मीडिया रिपोर्टमध्ये असं म्हटले  जात आहे की, यामाहाचा ही नवीन स्कूटर ट्रायसिटी 125 आणि ट्रायसिटी 300 कंपनीच्या निकेन यांच्यामधील एक आवृती आहे.