Skoda Octavia RS245 ला पुढील वर्षात मिळणार जनरेशन अपडेट, जाणून घ्या अधिक
Skoda Octavia RS245 (Photo Credits-Facebook)

चेक ऑटोमेकरची परफॉर्मेन्स-ओरिएंटेड सेडान Skoda Octavia RS245 ला पुढील वर्षात भारतात मध्ये जनरेशन अपडेट मिळू शकते. सध्या प्रमाणे नव्या सेडानमध्ये CBU पहायला मिळणार आहे. दरम्यान, याचे लिमिटेड अॅडिशन भारतात येणार आहे. याच्या परफॉर्मेन्स सेडानची किंमत 35.99 लाख रुपये आहे. याच्या एक्सटीरियर आणि इंटीरियर मध्ये खास बदल करण्यात येणार आहेत. नव्या 2020 स्कोडा ऑक्टेविया RS245 एक 2.0L टर्बो पेट्रोल इंजिन दिले जाणार आहे. जे 245bhp पॉवर आणि 370Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे.

रिपोट्सनुसार, 2020 स्कोडा ऑक्टोविया RS245 आधीच्या तुलनेत अधिक स्पोर्टी दिसणार आहे. फ्रंट ग्रिल, एअर डॅम, विंग मिरर, डिफ्युजर आणि रियर बूट लिप स्पॉइलरवर ब्लॅक आउट ट्रिटमेंट याच्या अपडेट लूकमध्ये अधिक खुलून दिसणार आहे. फ्रंट बंपर आणि फॉग लॅप्सला सुद्धा नवे रुप दिले आहे. अन्य डिझाइन हाइटलाइट्ससाठी यामध्ये स्टील एलईडी हेडलॅम्प, साइड स्कर्टवर ब्लॅक इंसर्ट, ब्लॅक रुफ, ब्लॅक अलॉय व्हिल आणि स्मोक्ड एलईडी टेललॅम्पचा समावेश आहे. ब्लॅक फिनिशिंगमध्ये फ्रंट आणि टेलगेटवर वीआरएस बॅजिंग दिले गेले आहे.(Audi लवकरच घेऊन येणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 400km अंतर कापणार)

याच्या इंटीरियर बद्दल बोलायचे झाल्यास रेग्युलर मॉडेलच्या तुलनेत नव्या 2022 स्कोडा ऑक्टेविया RS245 मध्ये कंट्रास्ट स्टिचिंगसह डुअल टोन इंटीरियर थीम दिली आहे. याच्या प्रीमियम सेडानमध्ये 10 इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेन्मेंट सिस्टिम, एलईडी लाइटिंग, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल, फ्रंट आणि रियर पार्किंग सेंसर, क्रुज कंट्रोल, इलेक्ट्रिक बूट दिल आहे. कीलेस एन्ट्री, टर्न असिस्टंट आणि एग्झिट वॉर्निंग आणि अन्य लेटेस्ट फिचर्स पहायला मिळणार आहेत.

इंजिन मध्ये 2.0 लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे. जो 200bhp ची पॉवर आणि 2.0 लीटरचा टर्बो डिझेल आणि हायब्रिड सिस्टिमसह 1.4 लीटरच्या पेट्रोलसह उतरवली जाणार आहे. गेल्या डिझेल मॉडेलच्या तुलनेत नव्या युनिट 16bhp अधिक पॉवरफुल आहे. टर्बो हायब्रिड सेटअप 242bhp ची पॉवर आणि 400Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे. ट्रान्समिशन बद्दल बोलायचे झाल्यास, सेडानमध्ये 7 स्पीड DSG ऑटोमेटिक गिअरबॉक्स असणार आहे.