Audi लवकरच घेऊन येणार आपली पहिली इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 400km अंतर कापणार
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे लॉन्चिंग केले जात आहे, दरम्यान, सध्या काही निवडक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार बाजारात उतरवल्या आहेत. यामध्ये काही आलिशान वाहन निर्माते वेगाने पुढे जात आहेत. यापूर्वीच मर्सिडीजची पहिलीच इलेक्ट्रिक कारची लॉन्चिंग करण्यात आली होती. त्यानंतर आता ऑडी इंडिया (Audi India) यांच्याकडून येणाऱ्या महिन्यात आपली इलेक्ट्रिक एसयुवी ई-ट्रॉन लॉन्च करण्याची तयारी केली जात आहे.(Hyundai ने झळकवला त्यांच्या पहिल्या मायक्रो एसयुवीचा टीझर, 4 लाख रुपये किंमत असण्याची शक्यता)

भारतात आपल्या अधिकृत लॉन्चिंगपूर्वी जर्मन कार निर्मात्यांनी अधिकृत वेबसाइटवर याचे मॉडेल लिस्ट केले आहे. डायमेंन्शनबद्दल बोलायचे झाल्यास या आगामी मॉडेलची लांबी 4901mm असणार आहे. यामध्ये कंपनी दोन 125kW आणि 140kW इलेक्ट्रिक मोटर्सचा उपयोग करु शकते. दोन्ही मोटर्स क्रमश: पुढे आणि मागच्या एक्सलवर दिले जाणार आहेत. जी 402bhp आणि 664Nm टॉर्कचा दावा करतात.

मीडिया रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की. ही कार 200 किमी प्रति तासाच्या टॉप स्पीड लैस असणार आहे. तसेच सिंगल चार्जमध्ये 400km हून अदिक ड्रायव्हिंग रेंज देणार आहे. तसेच चार्जिंग बद्दल बोलायचे झाल्यास ही DC फास्टर चार्जरचे वापर करुन 30 मिनिटांमध्ये 80 टक्के चार्ज केली जाऊ शकते. त्याचसोबत 230V फास्ट 400V सिस्टिमसह होम एसी चार्जरच्या माध्यमातून सुद्धा ती चार्ज केली जाऊ शकते.(2021 Kia Seltos आणि Sonet Facelift SUV भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह खासियत)

ऑडी इंडियाची ऑडी-ई-ट्रॉनचे इंटिरियर मल्टी-फंक्शन स्टिअरिंग व्हिल, प्रिमियम बँग अॅन्ड ओल्फसेन साउंड सिस्टिम, फोर झोन क्लायमेंट कंट्रोल, मल्टीपल टचस्क्रिन, एम्बिएंट लाइटिंग, पॉवर मोड, पॅनारोमिक सनरुफ, रिजनेटिव्ह ब्रेंकिंगसह काही फिचर्स लैस असणार आहे. त्याचसोबत यामध्ये एक 360 डिग्री कॅमेरा, इलेक्ट्रिक स्टिअरिंग व्हिल अॅडजेस्टेबल, पॅनारोमिक ग्लास सनरुफचा समावेश असणार आहे.