जुनी कार भंगारात विकल्यास नव्या गाडीवर मिळणार 'ऐवढा' डिस्काउंट, जाणून घ्या अधिक
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

केंद्र सरकारकडून देशात प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नव्या गाड्या खरेदीच्या प्रोत्साहनासाठी एक मोठे पाऊल उचचले आहे. त्यानुसार केंद्रीय वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी जुन्या कार विक्री करणाऱ्यांसंदर्भात एक घोषणा केली आहे. त्याअंगतर्गत जर एखाद्या ग्राहकाला जुनी गाडी भंगारात विक्री करायची असेल तर त्याला नव्या कार खरेदीवर 5 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. असे केल्यास प्रदुणात घट सुद्धा होणार आहे. परंतु सध्या जुन्या गाड्या रस्त्यांवरुन धावत असताना त्यामधून निघणारा धूर हा प्रदुषणाचे एक कारण ठरत आहे. जुनी वाहने कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.(FASTag देशभरात बंधनकारक पण मुंबई मध्ये Bandra-Worli Sea Link सोबत 5 टोलनाक्यांवर मार्च महिन्यापर्यंत स्वीकरली जाणार रोख रक्कम!)

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अशी सुद्धा घोषणा केली आहे की, आता सर्व जुन्या वाहनांना स्वचालित फिटनेस टेस्ट पास करावी लागणार आहे. त्यानुसार जर ही चाचणी न पास झाल्यास त्यांना रस्त्यावर चालवण्याची परवानगी दिली जाणार नाही आहे. तरीही सुद्धा गाडी चालवल्यास त्याच्या मालकाला दंड भरावा लागणार आहे.(Dual Airbags Compulsory In All New Cars: येत्या 1 एप्रिलपासून कारच्या पुढील दोन्ही सीट्सवर Airbags असणे अनिवार्य)

जुन्या कार संदर्भात घेण्यात आलेल्या या निर्णयानुसार नव्या वाहनांवर दिल्या जाणाऱ्या सूटसह प्रदुषण पसरवणाऱ्या वाहनांवर ग्रीन टॅक्स आणि अन्य शुल्कांचा समावेश आहे.दरम्यान, या नव्या निर्णयामुळे देशात रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटले आहे. त्याचसोबत प्रदुषण सुद्धा कमी होणार आहे.