बाईक चाहते आणि भारतातील दुचाकी व्यवासायांमध्ये अग्रगण्य असलेली बाईक उत्पादक Royal Enfield कंपनीने आपली बहुचर्चीत Classic 350 लॉन्च केली आहे. विशेष म्हणजे ही बाईक सिंगल सीट आहे. त्यामुळे बाईक ड्रायव्हींगचा आनंद घेताना पाठीमागे बसलेल्या 'गर्लफ्रंड' किंवा मित्रांच्या सूचनांपासून बाइकरची सूटका होणार आहे. Royal Enfield Classic 350 दोन रंगामध्ये उपलब्ध आहे. Royal Enfield Classic 350 चा सामना Jawa कंपनीच्या Jawa Perak या बाईकशी होण्याची शक्यता आहे.
Royal Enfield Classic 350 फीचर्स
Classic 350 बाईकमध्ये Alloy व्हील, फ्यूल टँक स्टीकर, एयर फ्लाय इंजिन गार्ड यांसारखे फीचर्स आहेत. तसेच कंपनीने या बाईकवर दोन वर्षांची वॉरंटीही दिली आहे. या बाईच्या इंजिनबाबत बोलायचे तर, या बाईकला 346 सीसी सिंगल सिलेंडर आणि एयर कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5- स्पीड गियरबॉक्स 19.8 बीएचपी इतकी शक्ती देते जी 28 एनएम का टॉर्क निर्माण करते.
Royal Enfield Classic 350 किंमत
Royal Enfield Classic 350 भारतातील एकूण सहा शहरांमध्ये उपलब्ध आहे. यात दिल्ली-एनसीआर, मुंबई, चेन्नई, बंगळुरु, पुणे आणि हैदराबाद या शहरांचा समावेश आहे. एका एक्स शहरातील शोरुममध्ये या बाईकची किंमत 1.45 लाख रुपये इतकी असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा, Royal Enfield बाईकच्या किंमतीत वाढ; पाहा नवी किंमत)
दरम्यान, Royal Enfield Classic 350 चा सामना Jawa कंपनीच्या Jawa Perak या बाईकशी होण्याची शक्यता आहे. जावाच्या Perak मध्ये ड्युअरल चॅनल एबीएससोबत पुढच्या पाठिमागच्या चाकाला डिस्क ब्रेक आहेत. सोबतच पुढच्या बाजूला इनवर्टेड फॉर्क्स आणि पाठिमागच्या बाजूला मोनोशॉक सस्पेन्शन देण्यात आहे. Perak मध्ये 334 सीसी चे DOHC, फोर वॉल्व लिक्विड कूल्ड इंजन आहे. जे 30 बीएचपी पॉवर आणि 31 एनएम टॉर्क निर्माण करते. या, सहा स्पीड ट्रांसमिशन आहेत. कंपनी ने ही बाइकत 35 किमी प्रतिलीटर माइलेज देऊ शकेल असा दावा केला आहे.