Royal Enfield  बाईकच्या किंमतीत वाढ; पाहा नवी किंमत
Royal Enfield (Photo Credit: Wikimedia Commons)

भारतात रॉयल एनफील्ड (Royal Enfield) कंपनीच्या बाईकला भारतात अधिक पसंती दिली जात आहे. बुलेटची निर्मिती करणारी ख्यातनाम कंपनी रॉयल एनफील्ड कंपनीने त्यांच्या बुलेट 350 केएस (Royal Enfield Bullet 350 KS) आणि बुलेट 350 ईसच्या (Royal Enfield Bullet 350 ES) किंमतीत वाढ करुन चाहत्यांना निराश केले आहे. या दोन्ही बाईक ऑगस्ट महिन्यात लॉन्च झाल्या होत्या. बुलेट 350 केएसची किंमत 1 लाख 12 हजार तर, बुलेट इएसची किंमत 1 लाख हजार इतकी होती. या दोन्ही बाईकच्या किंमतीत अनुक्रमे 2 हजार आणि 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. ही किंमत दिल्ली येथील शोरुममधील आहे.

फायनेशियल एक्सप्रेस यांच्या अहवालानुसार, रॉयल एनफील्ड कंपनीने बुलेट 350 केसच्या किंमतीत 2 हजारांनी वाढ केली आहे तर, बुलेट 350 ईसच्या किंमतीत 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. या बाईकमध्ये सिंगल चॅनेल एबीएस सिस्टम देण्यात आले आहे. तसेच या दोन्ही बाईक ड्युअल चॅनेल एबीएस व्हर्जनमध्येही उपलब्ध आहेत. महत्वाचे म्हणजे, बुलेट कंपनी अधिक जुनी असून अनेक लोकांचा रॉयल एनफिल्डच्या प्रोडक्टवर विश्वास आहे. हे देखील वाचा- Harrier पासून Safari पर्यंत, टाटाच्या कारवर तब्बल 1 लाखाहून अधिक सूट; जाणून घ्या कोणत्या गाडीवर किती डिस्काउंट

 

रॉयल एनफिल्डच्या या दोन्ही बाईकला अधिक पसंती मिळत आहे. सध्या या बाईकमध्ये 2 ते 4 हजार रुपयांची वाढ झाली आहे. मात्र, काही काळाने बुलेट 350 केएस आणि 350 ईस या बाईकमध्ये 10 ते 15 हजार रुपयांची वाढ होऊ शकते.