Royal Enfield Bullet Bill Viral: रॉयल एनफील्ड बुलेट फक्त  ₹ 18,700 मध्ये, 1986 चे बिल सोशल मीडियावर व्हायरल
Royal Enfield Bullet Bill | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Royal Enfield Bullet 350 ही दणकट दुचाकी देशभरातील नागरिक पाठिमागील अनेक वर्षांपासून खरेदी करत आहेत. आजघडीला ही दुचाकी खरेदी करायची तर त्याची किंमत लाखांमध्ये गेली आहे. पण अवघ्या 37 वर्षांपूर्वी रॉयल एनफील्ड बुलेट किती रुपयांना विकली जात होती याची आपणास कल्प ना आहे काय? सोशल मीडियावर एक 1988 सालचे बिल सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral News) झाले आहे. या बिलावर रॉयल एनफील्ड बुलेट खरेदी केल्याची तारीख आणि किंमत आहे. त्या वेळची किंमत आणि आजची किंमत पाहून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल.

रॉयल एनफील्ड बुलेट या दुचाकीने पाठिमागील अनेक वर्षांपासून ग्राहकांवरील आपली भूरळ कामय ठेवली आहे. पाठिमागच्या अनेक वर्षांमध्ये बुलेटची अनेक व्हर्जन आली. त्यात कंपनीने वेळोवेळी विविध बदलही केले. परंतू, कंपनीने नेहमीच गाडीचा लूक कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे अनेक बदल होऊनही बुलेटचा लूक तोच राहिला आहे. विशेष म्हणजे कंपनीचे हे आजवर सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे.

रॉयल एनफील्डचे अधिकृत विक्रेते असलेल्या एका शोरुमने दिलेल्या माहितीनुसार, बुलेटच्या 'ऑल न्यू क्लासिक 350' मॉडेलची ची किंमत ₹ 2.2 लाख पासून सुरू होते. पण तुम्हाला माहिती आहे का, याच दुचाकीची किंमत एकेकाळी फक्त 18,700 रुपये इतकी होती. किंमत ऐकून काहिसे विचित्र वाटत असले तरी हे खरे आहे. याचा एक पुरावाही पुढे आला आहे. (हेही वाचा, कोणत्या लोकांनी Royal Enfield खरेदी करु नये? होईल नुकसान)

Royal Enfield Bullet 350 चे 23 जानेवारी 1986 चे एक बिल इंटरनेटवर व्हायरल झाले. हे बिल बिईंग रॉयल या विंटेज बाइकच्या मालकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. बुलेटचे बील 36 वर्षे जुने आहे. बुलेटचे ₹ 18,700 चे बीजक 36 वर्षे जुने आहे. बोकारो, झारखंड येथे संदीप ऑटो कंपनी नावाच्या डीलरने जारी केलेले हे बील भलतेच व्हायरल झाले आहे. बिलात उल्लेख असलेल्या बुलेटला पूर्वी केवळ एनफिल्ड बुलेट म्हणून ओळखले जात असे. ही एक दणकट दुचाकी होती. भारतीय सैन्यातही गस्त घालण्यासाठी या बुलेटचा वापर केला जात असे.

व्हायरल बिल

 

View this post on Instagram

 

A post shared by Being Royal (@royalenfield_4567k)

दरम्यान, 1986 चे हे बिल सोशल मीडियावर (इन्स्टाग्राम) शेअर केल्यापासून आतापर्यंत म्हणजे हे वृत्त लिही पर्यंत या पोस्टला पोस्टला 53,000 पेक्षा जास्त लाईक्स आहेत. एका व्यक्तीने सांगितले, "माझ्याकडे 1984 फेब्रुवारीचे मॉडेल आहे ज्याची किंमत ₹ 16100 आहे. ही बुलेट आजही माझी साथीदार आहे. 38 वर्षांहून अधिक काळ मी ती वापरतो आहे.