Renault Festive Discount Offers: रेनॉल्ट कंपनीच्या कार खरेदीवर बंपर डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर बद्दल अधिक
Renault Triber (Photo Credits: Twitter)

भारतात फेस्टिव्ह सीजनची सुरुवात होणार असल्याने ऑटोमोबाईल कंपन्या त्यांच्या कारवर अधिकाधिक ऑफर्स देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहेत. याच दरम्यान आता Renault ने सुद्धा त्यांच्या कार खरेदीवर बंपर डिस्काउंट देण्यास सुरुवात केली आहे. या ऑफरचा फायदा ग्राहकांना संपूर्ण फेस्टिव्ह सीजन मध्ये घेता येणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा जर नवी गाडी खरेदी करण्याचा विचार करत असल्यास ही तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे. तर जाणून घ्या रेनॉल्ट कंपनीच्या कारवर दिल्या जाणाऱ्या बंपर डिस्काउंटबद्दल अधिक. तसेच कारच्या अन्य फिचर्स बद्दल ही तुम्हाला येथे माहिती मिळणार आहे.(Maruti Brezza आणि Hyundai Venue ला टक्कर देण्यासाठी येणार Citroen ची नवी कार, जाणून घ्या अधिक)

कंपनीच्या Renault Kwid या मॉडेलवर 40 हजारांपर्यंत डिस्काउंट दिला जाणार आहे. या डिस्काउंटचा फायदा ग्राहकांना ऑक्टोंबर महिन्यात होणार आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 9 हजार रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आणि ग्रामीण ग्राहकांना स्पेशल डिस्काउंट दिला जाणार आहे. त्याचसोबत ग्राहकांना 3.99 टक्के स्पेशल इंट्रेस्ट रेट ही मिळणार आहे.

Renault Triber या कारची सुरुवाती किंमत 5.12 लाख रुपये आहे. तर कंपनी ट्रायबरवर पूर्णपणे 30,000 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर करत आहे. यामध्ये ग्राहकांना 9,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आणि ग्रामीण ग्राहकांना स्पेशल ऑफर दिली जाणार आहे. तसेच ऑफरमध्ये ग्राहकांना 3.99 टक्के स्पेशल इंट्रेस्ट रेट सुद्धा दिला जाणार आहे.(2020 Mahindra Thar SUV भारतात लॉन्च, किंमत 9.80 लाख रुपये)

रेनॉल्ट कंपनीच्या Duster या मॉडेलची किंत 8.59 लाख रुपये आहे. जर डिस्काउंट बद्दल बोलायचे झाल्यास कंपनी Renualt Duster- 1.5L वर 70,000 रुपयांचा डिस्काउंट ऑफर करत आहे. त्यात 30 हजारांपर्यंत कॉर्पोरेट डिस्काउंट आणि ग्रामीण ग्राहकांसाठी स्पेशल डिस्काउंट ही आहे.