2020 Mahindra Thar SUV (Photo Credits-Twitter)

2020 Mahindra Thar SUV भारतात लॉन्च करण्यात आली आहे. या गाडीची एक्स शो रुम किंमत 9.80 लाख रुपये आहे. ही एक 4X4 एसयुवी असून जबरदस्त ऑफ-रोडिंग क्षमतांपेक्षा लैस आहे. नवी Mahindra Thar ही दोन ट्रिम्स मध्ये उतरवण्यात आली आहे. ज्यामध्ये पहिली AX आणि दुसरी LX आहे. यामधील LX ट्रिम थारचे प्रीमियम वर्जन असणार आहे. भारतात आजपासून ही एसयुवी बुकिंगसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे.(Volkswagen च्या कारवर ग्राहकांना मिळणार तब्बल 1.6 लाखांपर्यंत डिस्काउंट, जाणून घ्या अधिक)

महिंद्रा कंपनीच्या या नव्या यएसयुवी थारमध्ये दोन इंजिन ऑप्शन्स दिले आहे. त्यात पहिला म्हणजे 2.0 लीटर m Stallion TGDi पेट्रोल इंजिन आहे. तर दुसरा 2.2 लीटर mHawk डिझेल इंजिन आहे. यामुळे एसयुवीला जबरदस्त पॉवर मिळण्यास मदत होणार आहे. त्याचसोबत कारमध्ये 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि एक 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनचे ऑप्शन दिले आहे.(महिंद्रा कंपनीची Bolero मॉडेल महागली, जाणून घ्या नवी किंमत)

फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये स्पोर्टी फ्रंट सीट्स, 50:50 पार्टिशनसह फ्रंट फेसिंग रियर सीट, हाइट अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, को-पॅसेंजर सीटवर सिंगल टच टिप आणि स्लाइड सिस्टिम, टिल्ट अॅडजस्टेबल स्टिअरिंग व्हिल, पॉवर विंडो, इलेक्ट्रिकली अॅडजस्टेबल ओआरवीएम, रिमोट फ्लिरसह सेंट्रल लॉकिंग, ड्रिजिल रेजिस्टेंट इंन्फोटेनमेंट स्क्रिन, प्लास्टिक फ्लोर मॅट्स, वॉटर अॅन्ड डस्ट रेजिस्टेंट कंट्रोल स्विचसह ड्रेन प्लग्स सारखे फिचर्स मिळणार आहेत. त्याचसोबत कारचे इंटिरियर हे वॉटर फ्रेंडली तयार करण्यात आले आहे. कारमध्ये क्रुज कंट्रोल, ABS सह EBD, डुअल एअरबॅग्स, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल सारखे सेफ्टी फिचर्सचा सुद्धा समावेश आहे.