सध्या देशभरात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी म्हणून त्याचे जास्तीत जास्त उत्पादन करण्यात येत आहे. भारतीय बाजारातील दिग्गज ऑटोमोबाईल कंपन्यासुद्धा इलेक्ट्रिक वाहने बनवण्यावर अधिक जोर देत आहेत. तर स्कूटर पासून ते चार चाकी वाहने यामध्ये सामील आहेत. या सर्वांमध्ये खासकरुन इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर केला जात आहे.
त्यामुळे जर तुम्ही सुद्धा इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणार असल्यास त्याबाबत काही गोष्टी लक्षात असणे महत्वाचे आहे. तसेच इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी चार्जिंग, किती किमी गाडी सुरु राहू शकते यासंदर्भातील अन्य काही बाबी माहिती असणे महत्वाचे आहे. तर जाणून घ्या कोणत्या गोष्टी इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी लक्षात असाव्यात.
-स्कूटरची रेंज
इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज म्हणजेच ती एकदा फूल चार्ज केल्यावर किती किमी पर्यंत धावू शकणार आहे. त्याचसोबत एका दिवसात इलेक्ट्रिक स्कूटर किती किमी अंतर सुरु राहू शकते हे लक्षात घेणे फार महत्वाचे आहे. त्यानंतरच स्कूटर खरेदी करण्याचा विचार करावा. बाजारात सध्या 60-120 किमी रेंज देणाऱ्या स्कूटर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
-बॅटरी
इलेक्ट्रिक गाड्यांसाठी त्याची बॅटरी हा त्यामधील महत्वपूर्ण भाग आहे. ई-व्हेइकलची बॅटरी विजेवर चालणारी असते. त्यामुळे तुमच्या गाडीच्या बॅटरीची जेवढी जास्त वॅट क्षमता असेल तेवढी जास्त पावर आणि रेंज मिळू शकणार आहे. परंतु जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करत असल्यास त्याची बॅटरी वॉटरप्रूफ, शॉकप्रुफ किंवा बॅटरी रिप्लेस करण्याची सुविधा असणे आवश्यक आहे.
-सर्विस
पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये काही अडथळा आल्यास ती मॅकानिक ठिक करुन देतो. मात्र इलेक्ट्रिक गाड्यांसाठी असे नसते. त्यामुळे इलेक्ट्रिक गाडीत काही प्रॉब्लेम आल्यास तुम्हाला गाडीच्या अधिकृत सर्विस सेंटरमध्ये जाऊन दाखवावी लागते. त्यासोबत काही खरेदी करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती, पॉलिसी आणि वॉरंटीबाबत अधिक जाणून घ्या. तसेच कंपनी स्पेअर पार्ट्स बनवते की नाही याबाबत सुद्धा विचारा.
-तुम्हाला गरजेची आहे की नाही?
इलेक्ट्रिक गाड्या खरेदी करण्याचा नवा ट्रेन्ड सुरु झाला आहे. त्यामुळे जर तुमचा एखादा मित्र इलेक्ट्रिक गाडी खरेदी करत आहे म्हणून तुम्ही सुद्धा ती खरेदी करणार असल्यास ती गोष्ट चुकीची आहे. त्यामुळे गाडी खरेदी करण्यापूर्वी तुम्हाला त्याची खरच गरज आहे का हे निश्चित करा.(देशातील पहिली AI इनेबल इलेक्ट्रिक बाईक लॉन्च; अवघ्या 4 हजारात घेऊन जाऊ शकता घरी, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत)
तसेच इलेक्ट्रिक गाड्या किंवा स्कूटरची किंमत जास्त ठेवण्यात आली आहे. कारण या गाड्यांमध्ये हाय टेक फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यापूर्वी पूर्णपणे विचार करुन त्याबाबत योग्य तो निर्णय घेणे आवश्यक आहे.