ओला (Ola) इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्चिंग संदर्भात कंपनीने एक घोषणा केली आहे. त्यानुसार ही स्कूटर येत्या जुलै महिन्यात लॉन्च केली जाणार आहे. या स्कूटरमध्ये स्वॅपेबल बॅटरीचा वापर करण्यात आला आहे. ही स्वॅपेबल बॅटरी स्कूटरची रेंज वाढवण्यास मदत करणार आहे. उत्तम तंत्रज्ञान लैस असलेली ही स्कूटरवर कंपनीकडून जोमात काम सुरु आहे. काही महिन्यांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय रस्त्यांवर धावताना दिसून येणार आहे. भारतात याची टक्कर TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर सोबत होणार आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला या दोन्ही स्कूटर संदर्भातील अधिक माहिती देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला कोणता ऑप्शन उत्तम आहे ते कळणार आहे.(Mahindra XUV700 मध्ये ग्राहकांना मिळणार धमाकेदार फिचर्स, जाणून घ्या अधिक)
Ola Electric Scooter फुल चार्जिंगमध्ये 250 किमी रेंज देण्यास सक्षम असणार आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटरचा लूक अत्यंत स्टायलिश असणार आहे. तसेच याचे डिझाइन अत्यंत स्पोर्टी असणार आहे. ही 45 सेंकदात 0 ते 45kmph च्या वेगाने धावण्यास सक्षम असणार आहे. यामध्ये TFT इंस्ट्रुमेंट क्लस्टर फिट केले गेले आहे. त्याचसोबत यामध्ये 50 लीटर उत्तम अंडर सीट स्टोरेज सुद्धा मिळणार आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 2 मिलियन युनिट्स प्रति वर्ष मॅन्युफॅक्चर केले जाणार आहेत.(Fake Driving License : तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स बनावट तर नाही ना? घरबसल्या ऑनलाईन असं करा चेक)
तर TVS iQube मध्ये 4.4kW ची पॉवरफुल इलेक्ट्रिक मोटर दिली गेली आहे. जो 140Nm चा पीक टॉर्क जनरेट करणार आहे. ही स्कूटर जवळजवळ 4.2 सेकंदात 40 किमी प्रति तासाचा वेग पकडणार आहे. या स्कूटरच्या टॉप स्पीड बद्दल बोलायचे झाल्यास 78 किमी प्रति तास आहे. ही स्कूटर सिंगल चार्जमध्ये 75 किमि अधिक रेंज पकडू शकते. फिचर्स बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये ग्राहकांना नेक्स्ट जेन टीवीएस स्मार्ट एक्स कनेक्ट प्लॅटफॉर्म, अॅडवान्स टीएफटी क्लस्टर, टीवीएस आयक्यूब अॅप, जिओ फेसिंग, नेविगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस, लास्ट पार्क लोकेशन, इनकमिंग कॉल अलर्ट/एसएमएस अलर्ट मिळणार आहे.