नवी MG Gloster 7 सीटर Savvy वेरियंट 9 ऑगस्टला होणार भारतात लॉन्च
MG Gloster(Photo Credits; MG Motors India)

MG Motor India ने घोषणा केली आहे की, त्यांची 9 ऑगस्ट रोजी Gloster SUV ची नवी 7 सीटर Savvy वेरियंट लॉन्च केली जाणार आहे. सध्या Savvy संस्करण फक्त 6 सीटर लेआउटमध्ये ही उपलब्ध आहे. ग्लोस्टर एसयुवी सीटर ट्रिम सध्याच्या 6 सीटर सेवी वेरियंटच्या तुलनेत अधिक दमदार असण्याची अपेक्षा केली जात आहे. अद्याप या कारच्या किंमती बद्दल अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.(लॉन्चिंग पूर्वी इंटरनेटवर Custo MPV चे झळकले फोटो, ग्राहकांना मिळणार हे धमाकेदार फिचर्स)

एमजीने ग्लोस्टर एसयुवी गेल्या वर्षात ऑक्टोंबर मध्ये देशात उतरवली होती. ही एसयुवी एक प्रीमियम लग्जरी एसयुवी सेगमेंटचे मॉडेल आहे. SUV ही चार वेरियंट्स- सुपर, स्मार्ट, शार्प आणि सेवी मध्ये झळकवली आहे. ज्यामध्ये अखेरची टॉप-ऑफ-द-लाइन वेरियंट आहे. आगामी एमजी ग्लोस्टर एसयुवी 7 सीटर सेवी वेरियंट व्यतिरिक्त एमजी ग्लोस्टरमध्ये सध्या सुपर आणि शार्प वेरियंटसह 7 सीटर लेआउट मिळतो.

टॉप स्पेक सेवी वेरियंट 12.2 इंचाचा टचस्क्रिन इंन्फोटेनमेंट सिस्टिम, 12 स्पीकर स्टिरिओ सिस्टिम, अॅप्पल कारप्ले आणि अॅन्ड्रॉइड ऑटो, एक पॅनारोमिक सनरुफ,लेदर अपहोल्स्ट्री, 64 रंगाचे एम्बिंट लाइटिंग, 360 डिग्री कॅमेरा सारखे दमदार फिचर्स लैस असते. या फिचर्स व्यतिरिक्त दमदार एसयुवी मध्ये ग्राहकांना इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल ड्रायव्हर सीट, ऑटो लेवलिंग एलईडी हेडलॅम्पसह 19 इंचाचा डायमंट कट अलॉय व्हिल सुद्धा दिला जाणार आहे.(सिंगल चार्जमध्ये 25 किमी रेंज देणार 'ही' इलेक्ट्रिक सायकल, जाणून घ्या खासियत)

नव्या 7 सीटर ट्रिम अॅडेप्टिव्ह क्रुज कंट्रोल, ऑटोमॅटिक पार्किंग असिस्ट, फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग, ऑटोमॅटिक इमरजेंसी ब्रेकिंग, ब्लाइंट स्पॉट डिटेक्शन आणि लेन चेंज अलर्ट सारखे फिचर्ससह अॅडवान्स ड्रायव्हर असिस्टेंट सिस्टिम लैस असणार आहे.