Maruti Suzuki ने परत घेतल्या 40,618 WagonR कार, फ्यूल हॉजमध्ये गडबड असल्याची माहिती
WagonR | (Photo Credits: marutisuzuk)

कार उत्पादक कंपनी मारुती सुजुकीने 40,618 Wagon R कार परत घेतल्या आहेत. कारमध्ये काही त्रुटी राहिल्याच्या तक्रारी आल्यानंतर कंपनीने हा निर्णय घेतला आहे. मारुती सुजुकी (Maruti Suzuki India) ही देशातील सर्वात मोठी वाहन उत्पादक कंपनी आहे. 15 नोव्हेंबर 2018 ते 12 ऑगस्ट 2019 या कालवधीत उत्पादीत केलेल्या गाड्या कंपनीने मागे घेतल्या आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, कारमधील इंधनवाहीनीत काही समस्या होत्या. त्यामुळे या गाड्या परत मागविण्यात आल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की, कंपनी डीलर्स ग्राहकांना 24 ऑगस्टला संपर्क करेन आणि कोणतेही शुल्क न आकारता कार परत मागवेन. दरम्यान, अनेक कंपन्या आपल्या वाहनात काही त्रुटी राहिल्या असतील तर, वाहने परत मागवतात व त्या त्रुटी दूर करुन त्या गाड्या पुन्हा बाजारात आणतात. ही सर्वसाधारण प्रक्रिया समजली जाते. प्रतिमासंवर्धनासाठी कंपन्या हे पाऊल उचलतात.

वाहनउद्योगातील (ऑटो इंडस्ट्री) मंदी ध्यानात घेऊन मारुती सुजुकी इंडिया कंपनीने जुलै महिन्यात आपल्या उत्पादनात 25.15 इतकी कपात केली आहे. मारुती कंपनीने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे की, त्यांनी जुलै 2019 मध्ये 1,33,625 इतक्या वाहनांचे उत्पादन केले आहे. एक वर्षापूर्वी याच महिन्यात कंपनीने 1,78,533 इतक्या युनिट्सचे उत्पादन केले होते. (हेही वाचा, Automobile Sector Crisis: 15,000 हजार कामगारांच्या नोकऱ्या गेल्या; 18 महिन्यांत 286 डिलरशिप आउटलेट झाली बंद)

कंपनीने म्हटले आहे की, मारुती आल्टो, वैगनआर, सेलेरियो, इग्निस, स्विफ्ट, बलेनो, डिजायर यांसह छोटीआणि कॉम्पॅक्ट सेग्मेंट मध्ये जुलै 2019 मध्ये उत्पादनात 25 टक्के घट होऊन 95,733 वाहनांव आले. जिप्सी, विटारा ब्रेजा, अर्टिगा आणि एस-क्रॉस यांसारख्या यूटिलिटी वाहनांचे उत्पादन 21.26 टक्क्यांवरुन 19,464 युनिट्सवर पोहोचले. दरम्यान, देशातील ऑटो इंडस्ट्री सध्या अत्यंत वाईट स्थितीतून जात आहे. कंपन्यांचे उत्पादन होत आहे परंतू विक्री प्रचंड घटली आहे. कार आणि दुचाकी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करताना दिसत आहेत.