Maruti Suzuki Ertiga चं लवकरच CNG मॉडेल येणार ?
New 2018 Maruti Ertiga (Photo Credits: Suzuki.com

मारुती सुझुकीने नुकतीच इर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) कार नव्या अंदाजात लॉन्च केली आहे. बाजारात ही कार साऱ्या डीलर्सपर्यत पोहचल्यानंतर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या कारच्या मॉडेलची निर्मिती बंद केली जाणार आहे. नव्या इर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) कारची किंमत 7.74 लाख पासून सुरु होते. टॉप वेरिएंट 10.90 लाखामध्ये उपलब्ध असेल. Maruti Suzuki Next Gen Ertiga ची फिचर्स काय असतील ?

सध्या पेट्रोल आणि डिझेल या दोन व्हेरिएंटमध्ये कार लॉन्च करण्यात आली आहे. मात्र लवकरच इर्टिगा (Maruti Suzuki Ertiga) या कारचं CNG मॉडेलदेखील बाजारात येणार असल्याची चर्चा रंगली आहे. Maruti Suzuki Next Gen Ertiga चं बुकिंग सुरु, अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये बुक करा नवी इर्टिगा

AutoCar च्या रिपोर्टनुसार, पुढील सहा महिन्याच्या कालावधीमध्ये Maruti Suzuki Ertiga चं सीएनजी व्हेरिएंट बाजारात येणार आहे. नव्या मध्ये 1.5 लीटर चं मोटार असेल. हे CNG फ्युअलवर काम करणार आहे. या नव्या व्हेरिएंटमध्येही स्मार्ट हाइब्रिड टेक्नोलॉजीचा वापर करण्यात येणार आहे. कारमध्ये ड्युअल बॅटरी सेटअप असेल. किंमतीबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.